Sa Vs Ind : भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका जाणार पाण्यात? दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट

India vs South Africa 2nd T20 After Durban washout rain may again play spoilsport in Gqeberha cricket news in marathi
India vs South Africa 2nd T20 After Durban washout rain may again play spoilsport in Gqeberha cricket news in marathisakal
Updated on

India vs South Africa 2nd T20 : पुढल्या वर्षी (२०२४) जून महिन्यात टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे; मात्र भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पहिला टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला.

दोन देशांमध्ये आज (ता. १२) दुसऱ्या टी-२० सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे, पण याही लढतीवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या युवा भारतीय खेळाडूंना स्वत:ची चुणूक दाखवण्याची पुरेशी संधी मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. विश्‍वकरंडकासाठीच्या सरावात पावसाचा अडथळा येतोय, असेच याप्रसंगी म्हणावे लागणार आहे.

India vs South Africa 2nd T20 After Durban washout rain may again play spoilsport in Gqeberha cricket news in marathi
SA vs IND : 'ईडन गार्डनचा आदर्श डोळ्यांसमोर...', सामना रद्द झाल्यानंतर गावसकरांची बोर्डावर जोरदार टीका

भारतीय संघ विश्‍वकरंडक आटोपल्यानंतर थेट ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका खेळला. या मालिकेत शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली होती. सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग या दोन खेळाडूंचा या मालिकेत समावेश होता. जून महिन्यात वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्‍वकरंडकासाठी सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग या दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड होऊ शकते. याचा अर्थ फक्त दोनच खेळाडूंना टी-२० क्रिकेटचा सराव आतापर्यंत करता आला आहे.

दरम्यान, भारताप्रमाणे दक्षिण आफ्रिकेसमोरही खेळाडूंच्या निवडीचा प्रश्‍न उद्‌भवणार आहे. त्यांनाही टी-२० विश्‍वकरंडकाआधी फक्त पाच टी-२० सामने खेळावयाचे आहेत. मार्को यान्सेन व जेराल्ड कोएत्झी या दोन खेळाडूंना पहिल्या दोनच लढतींसाठी निवडण्यात आले होते. पहिला सामना पावसामुळे झालाच नाही. त्यामुळे आता त्यांना फक्त एकाच लढतीत खेळता येणार आहे. पावसाचा अडथळा आल्यास दोन्ही खेळाडूंना सरावापासून दूरच राहावे लागेल.

आयपीएलवर सर्व मदार

टी-२० विश्‍वकरंडकाआधी भारतीय संघाला कमी टी-२० आंतरराष्ट्रीय लढती खेळायला मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय संघ आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर निवडला जाण्याची दाट शक्यता आहे. जून महिन्याआधी एप्रिल-मे यादरम्यान आयपीएल रंगणार आहे. त्यामुळे आयपीएल ही स्पर्धा टी-२० विश्‍वकरंडकाच्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

यशस्वी, ऋतुराज फॉर्ममध्ये पण...

यशस्वी जयस्वाल व ऋतुराज गायकवाड हे दोन्ही खेळाडू दमदार फलंदाजी करत आहेत. या दोघांनाही टी-२० विश्‍वकरंडकासाठी भारतीय संघात संधी द्यायला हवी; मात्र यामध्ये एक अडथळा निर्माण होऊ शकतो. रोहित शर्मा व विराट कोहली या दोन अनुभवी खेळाडूंनी अधिकृतपणे टी-२० प्रकारामधून माघार घेतलेली नाही. तसेच बीसीसीआयच्या निवड समितीकडूनही तसे सांगण्यात आलेले नाही. या दोन्ही खेळाडूंना संधी देण्यात आल्यास यशस्वी, ऋतुराजला भारतीय संघात स्थान मिळेल का, असा प्रश्‍न या वेळी निर्माण होणार आहे.

गोलंदाजांमध्ये चुरस

टी-२० विश्‍वकरंडकासाठी भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी गोलंदाजांमध्येही चुरस दिसून येत आहे. जसप्रीत बुमरा व अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांचे स्थान निश्‍चित आहे, पण इतर वेगवान गोलंदाजांना संधीचे सोने करावे लागणार आहे. कुलदीप यादव, रवी बिश्‍नोई या फिरकी गोलंदाजांनी ठसा उमटवला आहे. रवींद्र जडेजाही संघात आहे. त्यामुळे भारतीय संघाला फिरकी गोलंदाजांचा प्रश्‍न सतावणार नाही.

आज दुसरा टी-२० सामना

  • भारत - दक्षिण आफ्रिका

  • वेळ - रात्री ८.३० वाजता

  • प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्‌, डिस्ने-हॉट स्टार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()