IND vs SA : कॅप्टन हिटमॅन 'या' खेळाडूला देणार डच्चू; ही आहे Playing-11

या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो तर...
india vs south africa 2nd t20 match probable playing xi of rohit sharma
india vs south africa 2nd t20 match probable playing xi of rohit sharmasakal
Updated on

India vs South Africa 2nd T20: भारत आज गुवाहाटीच्या मैदानावर दुसरा टी-20 सामना खेळणार आहे. टीम इंडियाने पहिला टी-20 सामना 8 विकेटने जिंकला आहे. अशा स्थितीत टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका भारताला आजपर्यंत मायदेशात जिंकता आलेली नाही. मालिका जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करू शकतो.

india vs south africa 2nd t20 match probable playing xi of rohit sharma
IND VS SA : आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या T-20 सामन्यात बुमराला पर्याय शोधण्याचा प्रयत्न

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये फक्त काही दिवस बाकी आहे, KL राहुल रोहित शर्मासोबत सलामी करताना दिसू शकतो. विकेट्सच्या दरम्यानही हे खेळाडू शानदार धावा करतात. हे दोघेही भारतीय फलंदाजी आक्रमणाचा कणा आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केएल राहुलने शानदार 51 धावांची खेळी केली होती. विराट कोहली भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.

सूर्यकुमार यादव 2022 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 50 धावा केल्या होत्या. IPL 2022 पासून दिनेश कार्तिकने टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा त्याच्याकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी देऊ शकतो. रोहित पंतला डच्चू देऊ शकतो.

india vs south africa 2nd t20 match probable playing xi of rohit sharma
टीम इंडिया दुसऱ्यांदा बनली legends league चॅम्पियन; सचिन तेंडूलकरने रचला इतिहास

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. सिराज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये त्याने सर्वोत्तम खेळ दाखवला. दीपक चहर आणि अर्शदीप सिंगला त्याच्यासोबत खेळण्याची संधी मिळू शकते. भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या खेळपट्ट्यांवर कहर करण्यासाठी सज्ज आहेत. अक्षर पटेल उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत असून तो किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. हर्षल पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.