India vs South Africa 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता भारताचा क्रिकेट संघ आज (ता. १४) होणाऱ्या अखेरच्या सामन्यात मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरेल. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये जोहान्सबर्ग येथे तिसरा टी-२० सामना होणार असून याप्रसंगी यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ २-० अशी मालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.
भारतीय संघाला गोलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. दोन देशांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत भारतीय गोलंदाजांकडून निराशा झाली. अर्शदीप सिंग याच्या गोलंदाजीवर १५.५०च्या सरासरीने धावा काढण्यात आल्या. मुकेशकुमारच्या गोलंदाजीवर ११.३३च्या सरासरीने धावांची लूट करण्यात आली.
याआधी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली; पण अखेरचा सामना वगळता अर्शदीपला तसेच मुकेशला गोलंदाजीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. दीपक चहर याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्यामुळे भारतीय गोलंदाजी विभागाची चिंता आणखी वाढली आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग या दोन दुसऱ्या टी-२० लढतीत अर्धशतकी खेळी केली. हे दोन्ही फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. त्यांच्याकडून याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल. शुभमन गिल व यशस्वी जयस्वाल यांना दुसऱ्या लढतीत अपयशाला सामोरे जावे लागले. दोघांना आपला खेळ उंचवावा लागेल.
ॠतुराज गायकवाड तंदुरुस्त असल्यास त्याचा संघात समावेश होईल. टी-२० विश्वकरंडकाआधी कमी आंतरराष्ट्रीय सामने असल्यामुळे या मालिकेत पर्यायी खेळाडूंची चाचपणी केली जात आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येईल असे वाटत नाही. तिलक वर्मा व जितेश शर्मा हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा संघामध्ये असतील.
यजमान संघाला गोलंदाजीची चिंता
यजमान दक्षिण आफ्रिकन संघाने दुसरा टी-२० सामना जिंकत आघाडी मिळवली असली, तरी आजच्या लढतीत त्यांना गोलंदाजी विभागात चिंता सतावणार आहे. जेराल्ड कोएत्झी, मार्को यान्सेन हे गोलंदाज उद्याच्या लढतीत खेळणार नाहीत. तसेच लुंगी एनगिडी याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तोही संघात नसेल. आंदिल पेहलुकवायो, तबरेझ शम्सी, लिझाड विल्यम्स यांना गोलंदाजीत चमक दाखवावी लागणार आहे.
जोहान्सबर्गमध्ये छान प्रदर्शन
भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यामधील अखेरचा टी-२० सामना जोहान्सबर्गमध्ये होणार आहे. येथे भारतीय संघाची कामगिरी छान झाली आहे. येथे झालेल्या तीन टी-२० लढतींमध्ये भारताने विजय साकारले आहेत. एका टी-२० लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ॠतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेशकुमार, दीपक चहर.
दक्षिण आफ्रिका - एडन मार्करम (कर्णधार), ओटनिएल बार्टमॅन, मॅथ्यू ब्रिटझ्के, नांद्रे बर्गर, डोनोवान फेरेरा, रिझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, आंदिल पेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रीस्टन स्टुब्स, लिझाड विल्यम्स.
तिसरा टी-२० सामना
भारत-दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग
रात्री ८.३० वाजता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.