India Vs South Africa 2nd T20 Live : India Vs South Africa 2nd T20 Live : दक्षिण आफ्रिकेचे 228 धावांचे आव्हान पार करताना भारताचा डाव 178 धावात संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेने सामना 49 धावांनी जिंकत मालिकेचा शेवट गोड केला. दरम्यान, भारताची अवस्था 8 बाद 120 धावा अशी झाली होती. मात्र दीपक चाहरने 17 चेंडूत 31 धावांची खेळी करत उमेश यादवसोबत 9 व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचत भारताचा शतकी पराभव टाळला आणि लाज वाचवली.
हर्षल पटेलने 12 चेंडूत 17 धावा करत भारताला शतक पार करून दिले. मात्र एन्गिडीने त्याची देखील शिकार केली.
दिनेश कार्तिकने 21 चेंडूत तुफानी 46 धावांची खेळी केली. मात्र केशव महाराजने त्याला बोल्ड करत भारताला चौथा धक्का दिला. दरम्यान, सर्व मदार सूर्यकुमारवर असताना तो देखील 8 धावांची भर घालून माघारी परतला.
दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ठेवलेल्या 228 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात भारताला पहिला धक्का बसला. रबाडाने रोहित शर्माचा शुन्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही 1 धावेची भर घालून माघारी परतला. दरम्यान, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र एन्गिडीने 14 चेंडूत 27 धावा करणाऱ्या पंतला बाद करत पॉवर प्लेमध्ये भारताला तिसरा धक्का दिला.
रॉसोने स्टब्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी 87 धावांनची भागीदारी रचली. त्यामुळे 19 व्या षठकात आफ्रिकेने 200 धावांचा टप्पा पार केले. दरम्यान, रॉसोने आपले शतक 48 चेंडूत पूर्ण केले.
डिकॉक बाद झाल्यानंतर डावखुऱ्या रिली रॉसोने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने चौफेर फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेला 18 षटकात 192 धावा केल्या.
श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी मिळून 43 चेंडूत 68 धावांची खेळी करणाऱ्या क्विंटन डिकॉकला धावबाद केले.
क्विंटन डिकॉकने आक्रमक अर्धशतक ठोकत आफ्रिकेला 10 षटकात 96 धावांपर्यंत पोहचवले. त्याला रॉसोने देखील आक्रमक फलंदाजी करत चांगली साथ दिली.
उमेश यादवने आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बाऊमाची 8 चेंडूत केलेली 3 धावांची खेळी अखेर संपवली.
सलामीवीर क्विंटन डिकॉकने दक्षिण आफ्रिकेला दमदार सुरूवात करून दिली. त्याने 17 चेंडूत केलेल्या 25 धावांच्या जोगावर आफ्रिकेने 4 षटकात बिनबाद 30 धावांपर्यंत मजल मारली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या संघात काही बदल केले असून अर्शदीप सिंग पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर आहे त्याच्या जागी उमेश यादव संघात आला आहे. तर विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले आहे. याचबरोबर केएल राहुल देखील विश्रांती घेत असून त्याच्या जागी ऋषभ पंत सलामीला येण्याची शक्यता आहे.
भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी जरी काही बदल झालेले दिसले तरी संघ दक्षिण आफ्रिकेला 3 - 0 अशा व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.