राजकोट : भारताच्या 170 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 87 धावात ढेर झाला. भारताने सामना तब्बल 82 धावांनी जिंकत मालिकेत 2 - 2 अशी बरोबरी केली. भारताकडून आवेश खानने भेदक मारा करत 4 विकेट घेतल्या तर त्याला युझवेंद्र चहलने 2 तर हर्षल पटेल आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. फलंदाजीत दिनेश कार्तिकने आक्रमक 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला हार्दिक पांड्याने 46 धावा करून चांगली साथ दिली. आता पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील बंगळुरूमध्ये होणाऱ्या अखेरच्या सामन्यात मालिकेता निकाल लागणार आहे.
आवेश खानने 14 व्या षटकात डुसेन, जेनसेन आणि महाराज यांची विकेट घेत आफ्रिकेचे कंबरडे मोडले. यानंतर भारताने आफ्रिकेचा डाव 87 धावात गुंडाळला.
आवेश खानने रासी वेन डेर डुसेनला 20 धावांवर बाद करत आफ्रिकेला पाचवा धक्का दिला.
हर्षल पटेलने डेव्हिड मिलरचा 9 धावांवर त्रिफळा उडवत डेव्हिड मिलर आणि डुसेन ही जोडी फोडली.
युझवेंद्र चहलने इन फॉर्म बॅट्समन हेंन्रिक क्लासनला 8 धावांवर बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला.
सलामीवीर क्विंटन डिकॉक 14 धावांवर धावबाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात आवेश खानने ड्वेन प्रेटोरियसला शुन्यावर बाद करत आफ्रिकेला दोन धक्के दिले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला आवेश खानने टाकलेल्या चौथ्या षटकाचा पहिला चेंडू हाताला लागला त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
आपल्या आक्रमक फलंदाजीने भारतीय संघाला दीडशेचा टप्पा पार करून देणाऱ्या दिनेश कार्तिकला प्रेटोरियसने 55 धावांवर बाद केले.
एन्गिडीने 31 चेंडूत 46 धावा करणाऱ्या हार्दिक पांड्याला बाद करत भारताला पाचवा धक्का दिला.
केशव महाराजने भारताचा कर्णधार ऋषभ पंतला 17 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला. महाराजने हार्दिक आणि ऋषभची चौथ्या विकेटसाठी केलेली 41 धावांची भागीदारी संपवली.
एर्निच नॉर्त्जेने 26 चेंडूत 27 धावांची खेळी करणाऱ्या इशान किशनला बाद करत भारताला तिसरा आणि मोठा धक्का दिला.
मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यात देखील निराशा केली. त्याला मार्को येनसेनने 4 धावांवर बाद कर भारताला पॉवर प्लेमध्ये दुसरा धक्का दिला.
एन्गिडीने दुसऱ्याच षटकात भारताला पहिला धक्का दिला. त्याने गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला 5 धावांवर बाद केले.
दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघात काही बदल केले आहेत. कसिगो रबाडा आणि पार्नेल दुखापतीमुळे आजचा सामना खेळू शकणार नाहीत. तर रीझा हेंड्रिक्स देखील आजच्या सामन्याला मुकणार आहे. क्विंटन डिकॉक संघात परतला असून मार्को जेनसेन आणि एन्गिडीचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारताने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.