Video : "...चुना लगा दिया रे!"; भारताच्या पराभवावर पाकिस्तान संतापला!

संपूर्ण पाकिस्तान भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होता मात्र...
india vs south africa
india vs south africasakal
Updated on

India vs South Africa : टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर-12 फेरीतील गट-2 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर भारताची गट-2 मध्ये दुसऱ्या स्थानावर घसरण झाली, तर दक्षिण आफ्रिका 5 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवामुळे भारताच्या पुढील वाटचालीत फारसे नुकसान झाले नसले तरी पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. पाकिस्तानचे स्पर्धेतून बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे.

india vs south africa
IND vs SA : 'मंकडिंग'ला अश्विनचं नाव द्या संतप्त चाहत्यांची मागणी

भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते संतापले आहेत. पर्थमधील स्टेडियमबाहेरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विराट कोहलीने सोडलेल्या एडन मार्करामच्या झेलवरही प्रश्न उपस्थित केला आहे. भारताच्या पराभवाने हताश झालेल्या पाकिस्तानने याला फिक्स्ड मॅच म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या विजयासाठी संपूर्ण पाकिस्तान प्रार्थना करत होता, पण भारताला या स्पर्धेत पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. कोहलीने संपूर्ण समाजाला फसवले असे पाकिस्तानी चाहते म्हणतात. भारताचा माजी कर्णधार कोहलीने जसा झेल सोडला तसा गल्लीतील मुले सोडत नाहीत.

india vs south africa
Rohit Sharma : आम्ही त्यांना जिंकण्याची संधी दिली; रोहितने 'यांच्यावर' फोडले पराभवाचे खापर

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 133 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 40 चेंडूत 68 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 19.4 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.