भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील मतभेदाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेपासूनच या दोघांमध्ये दूरावा (Virat Kohli Rohit Sharma Controversy) निर्माण झाल्याची चर्चा रंगताना दिसली. त्यानंतर काही सामन्यात मैदानावर या दोघांनी एकत्रितपणे निर्णय घेत 'ऑल इज वेल' सीन दाखवून दिला. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या दोघांच्यातील मतभेद मिटवले, असे बोलले गेले. पण आता पुन्हा एकदा हीच चर्चा नव्याने सुरु झाली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने ही चर्चा फोल ठरवणारे भाष्य केले आहे. रोहितसंदर्भात त्याच्या तोंडून निघालेले शब्द हे दोघांच्यातील मतभेदाच्या चर्चेला पूर्णविराम देणारे आहे. रोहित शिवाय भारतीय संघ अधूरा आहे. तो भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आहे, अशा आशयाच्या वक्तव्याने कोहलीने दुखापतग्रस्त रोहितची उणीव जाणवेल, असे म्हटले आहे. टेस्टमध्ये रोहितला मिस करणार हे विराट मनापासून बोलला की...मतभेदाची चर्चा आणखी रंगू नये, यासाठी त्याने हा मास्टर स्ट्रोक खेळला असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला तर नवल वाटू नये.
रोहितसंदर्भात विराट म्हणाला की....
रोहित शर्मा हा टीम इंडियातील प्रमुख खेळाडू आहे. तो भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करतो. त्याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी सामन्यात सलामीवीराची उणीव भासेल.
कोहली आपल्या कॅप्टन्सीसंदर्भातही बोलला
कॅप्टन्सी गेल्यानंतर माझ्या फलंदाजीवर कोणताही परिणाम होणार नाही. ज्यावेळी मी मैदानात उतरतो त्यावेळी टीम इंडियासाठी जे करायला पाहिजे ते सर्व करण्यावर भर देतो. यापूर्वी वनडेत जसे योगदान दिले तसेच योगदना कॅप्टन्सी गमावल्यानंतरही देत राहिन.
बीसीसीआयने कोहलीला टी-20 संघाचे नेतृत्व न सोडण्याचा सल्ला दिला होता?
भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्यासंदर्भात बीसीसीआयसोबत चर्चा केली होती. यावेळी बीसीसीआयने माझ्या निर्णयाला सहमती दिली. नेतृत्व सोडू नये, असा कोणताही सल्ला बीसीसीआयकून मिळाला नाही. वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व कायम करेन, असे बोलणे झाल्याचेही कोहलीनं म्हटले आहे.
गांगुलींनी सांगितल होतं हे कारण...
दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माकडे वनडे संघाचे नेतृत्व देण्यात आले. नेतृत्वबदलासंदर्भात स्पष्टीकरण देताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराटच्या निर्णयामुळे बीसीसीआयला वनडेतील नेतृत्व बदल करावा लागला, असे म्हटले होते. मर्यादित षटकांमध्ये टी-20 आणि वनडेसाठी दोन वेगवेगळे कर्णधार शक्य नाही. आम्ही विराटला टी-20 संघाचे नेतृत्व सोडू नकोस, असे म्हटले होते. पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. परिणामी आम्हाला टी-20 नंतर वनडेचं नेतृत्व रोहित शर्माकडे द्यावे लागले, असे गांगुली यांनी म्हटलं होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.