उमरान मलिकने श्रीलंकेचा सेट झालेला सलामीवीर निसंकाला 72 धावांवर बाद करत लंकेची अवस्था 5 बाद 161 धावा अशी केली.
सलामीवीर पथुन निसंका आणि धनंजया डि सिल्वा यांनी चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली. निसंकाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र मोहम्मद शमीने धनंजया डि सेल्वाला 47 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
मोहम्मद सिराजनंतर उमरान मलिकने देखील श्रीलंकेला धक्का दिला. त्याने 28 चेंडूत 23 धावा करणाऱ्या चरिथ असलंकाला बाद केले.
भारताचे 374 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला मोहम्मद सिराजने पहिल्या 5 षटकातच दोन धक्के दिले. सिराजने अविष्का फर्नांडोला 5 तर कुसल मेंडीसला शुन्यावर बाद करत लंकेची अवस्था 5.3 षटकात 2 बाद 23 धावा अशी केली.
विराट कोहलीने बांगलादेश दैऱ्यानंतर ब्रेक घेतला होता. तो श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत खेळला नव्हता. मात्र फॉर्मच्या बाबतीत विराट कोहलीने बांगलादेश दौऱ्यावरील तिसऱ्या सामन्यातील कित्ता पुन्हा गिरवला. त्याने वनडेमध्ये सलग दुसरे शतक ठोकत भारताला 350 चा टप्पा पार करून दिली.
केएल राहुल आणि विराट कोहली यांनी चौथ्या विकेटसाठी 90 धावांची दमदार भागीदारी रचत संघाला 40 व्या षटकातच 300 पार पोहचवले. मात्र रजिथाने राहुलचा 39 धावांवर त्रिफळा उडवला.
विराट कोहलीने 47 चेंडूत अर्शशतक ठोकत भारताला 250 पर्यंत पोहचवले. भारताने 36 व्या षटकातच 250 धावांचा टप्पा गाठल्यामुळे भारत आजच्या सामन्यात 350 + धावांच्या पार जाऊ शकतो.
श्रीलंकेच्या धनंजया डे सिल्वाने श्रेयस अय्यरला 28 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. अय्यर बाद झाला त्यावेळी भारताच्या 29.1 षटकात 3 बाद 213 धावा झाल्या होत्या.
67 चेंडूत 83 धावांची आक्रमक खेळी खरणाऱ्या रोहित शर्माला अखेर मधुशंकाने बोल्ड केले. भारताला 173 धावांवर दुसरा धक्का बसला.
अखेर श्रीलंकेला भारताची सलामी जोडी फोडलण्याची संधी मिळाली. कर्णधार शानकाने 60 चेंडूत 70 धावांची खेळी करणाऱ्या शुभमन गिलला 20 व्या षटकात बाद केले.
रोहित पाठोपाठ शुभमन गिलने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 51 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत रोहितच्या साथीने भारतासाठी शतकी सलामी दिली.
पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताला धडाकेबाज सुरूवात करून देणाऱ्या रोहित शर्माने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर भारताने 13 षटकात नाबाद 87 धावांपर्यंत मजल मरली.
नाणेफेक जिंकणाऱ्या श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केल्यानंतर भारताने दमदार सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्या 4 षटकातच जवळपास 10 च्या सरासरीने 35 धावा केल्या.
भारताने पहिल्या सामन्यासाठी आपल्या संघात टी 20 स्टार सूर्यकुमार यादव आणि नुकतेच बांगलादेशविरूद्ध द्विशतक ठोकलेल्या इशान किशनला संधी दिलेली नाही.
IND vs SL 1st ODI : भारताचे 374 धावांचे आव्हान पार करताना श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाने झुंजार शतक ठोकत भारताला विजयासाठी 50 व्या षटकापर्यंत फरफरट नेले. त्याने नवव्या विकेटसाठी रजिथासोबत नाबाद शतकी धावांची भागीदारी रचत श्रीलंकेला 50 षटकात 8 बाद 306 धावांपर्यंत पोहचवले. अखेर भारताने सामना 67 धावांनी जिंकला. भारताकडून वेगवान गोलंदाजांची चांगला मारा केला होता. उमरान मलिकने 57 धावात 3 तर मोहम्मद सिराजने 30 धावात 2 बळी टिपले. त्यांना चहल, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेत चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, भारताने पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेसमोर 50 षटकात 7 बाद 373 धावा उभारल्या. भारताकडून विराट कोहलीने 87 चेंडूत 113 धावा ठोकत सलग दुसरे शतक ठोकले. मात्र सलामीवीर रोहित शर्माला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो 67 धावात 83 धावा करून बाद झाला. या दोघांपाठोपाठ शुभमन गिलने देखील 70 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने 10 षटकात 88 धावा देत 3 बळी टिपले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.