IND vs SL 1st T20 Hardik Pandya : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका उद्या (दि. 3) मुंबईतून सुरू होत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्याने पत्रकार परिषद घेतली. नवीन वर्षातील ही भारतीय कर्णधाराची पहिलीच पत्रकार परिषद होती. यावेळी हार्दिक पांड्याने संघाचे उद्दिष्ट, ऋषभ पंतचा अपघात आणि नवीन वर्षाचा संकल्प याबाबत आपले मत व्यक्त केले.
नवीन वर्षात भारताला आपला नवा टी 20 संघ उभारायचा आहे. त्यासाठी संघात मोठ्या प्रमाणावर बदल देखील करण्यात आले आहेत. भारतीय संघ श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्याशिवाय उतरणार आहे. त्यामुळे या नव्या भारतीय संघाकडे सर्वांचेच लक्ष असणार हे नक्की!
या नव्या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या नव्या वर्षातील पहिल्या पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘नवीन वर्षाचा सर्वात मोठा संकल्प हा वर्ल्डकप जिंकणे असणार आहे.’ हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, ‘आम्ही मैदानावर जावून आमचं सर्वस्व पणाला लावणार आहोत. मला वाटते की भविष्य उज्वल असेल.’
हार्दिक पांड्याला सरत्या वर्षाविषयी विचारणा झाल्यावर तो म्हणाला की, गेले वर्ष माझ्यासाठी जादूई राहिले. पुढचा विचार केला तर अजून खूप काही साध्य करायचं आहे. मी अजून काही साध्य केलेले नाही. येणाऱ्या वर्षात अनेक वर्ल्डकप स्पर्धा आहेत. त्यामुळे आमचं ध्येय हे वर्ल्डकप जिंकणे असेल.’ (Sports Latest News)
आशिया कप जिंकणाऱ्या श्रीलंका संघाविषयी बोलताना हार्दिक म्हणाला की, ‘आम्ही आशिया कपचा बदला वगेरे घेणार नाहीये. आम्हाला फक्त चांगले क्रिकेट खेळायचे आहे आणि हो आम्ही त्यांना जाणीव करून देऊ की ते आता भारतात आहेत.’ हार्दिक पांड्या ऋषभ पंतबद्दल देखील बोलला. तो म्हणाला की पंत लवकरात लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करतो.
हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.