श्रीलंका आणि भारत यांच्यातील टी-20 मालिके दरम्यान क्रुणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे सामना पुढे ढकलण्याची वेळ आली. मालिकेतील दुसरा टी-20 सामना आज बुधवारी होणार असून या सामन्यात भारतीय संघ कसा असणार याची चर्चा रंगली आहे. याच कारण क्रुणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या 9 खेळाडूंना आगामी दोन्ही सामन्याला मुकावे लागणार आहे. जे 9 खेळाडू विलगिकरणात आहेत त्यात शिखर धवनचे नावही असल्याचे समजते. त्यामुळे भुवनेश्वर कुमार भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. (India vs Sri Lanka 2nd T20 Shikhar Dhavan Ishan Kishan Hardik Pandya and other 6 players likely to miss remaining T20Is)
विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावर असताना श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडे मालिका 2-1 अशी जिंकली. पण आता टी-20 मालिकेतील उर्वरित सामन्यापासून तो दूर राहणार असल्याची चर्चा आहे. क्वारंटाईनमध्ये असलेल्या खेळाडूंमध्ये धवनचेही नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता धवनच्या जागेवर भुवनेश्वर कुमार कर्णधार पदी असण्याची शक्यता आहे.
क्रुणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्यासह पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, देवदत्त पडिक्कल आणि कृष्णप्पा गौतम यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे समजते. यात शिखर धनच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडू प्लेइंग इलेव्हन सिलेक्शनसाठी उपलब्ध असणार नाहीत.
क्रुणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती बीसीसीआयने मंगळावरी दिली होती. याशिवाय सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी नोंदवली होती. सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीनंतर उप-कर्णधार भुवीने गोलंदाजीतील धार दाखवून देत श्रीलंकेच्या गोलंदाजांना नाचवले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.