IND vs SL Playing-11: कर्णधार पांड्या 'या' 3 खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता!

IND vs SL Playing-11
IND vs SL Playing-11sakal
Updated on

India vs Sri lanka 2nd T20i Playing-11: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज संध्याकाळी 7:00 वाजता पुण्यातील MCA स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव केला.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्धच्या या टी-20 मालिकेतील दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका खिशात घालायची आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी कर्णधार हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 मोठे बदल करू शकतो.

IND vs SL Playing-11
Rishabh Pant: "माणुसकी नाही का..." पंतला अ‍ॅम्बुलन्समधून नेताना बहिणीचा संयम सुटला; व्हिडीओ व्हायरल

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवेल. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिला जखमी संजू सॅमसन असेल. टी-20 सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळाली, मात्र तो केवळ 5 धावा करून बाद झाला. आता दुखापतीमुळे संजू सॅमसन या टी-20 मालिकेतूनही बाहेर आहे.

IND vs SL Playing-11
Ranji Trophy: तब्बल तीन वर्षांनंतर पुनरागमन करत केदार जाधवचा तांडव

कर्णधार हार्दिक पांड्या यानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आणखी एक मोठा बदल करेल. पहिल्या टी-20 सामन्यात खराब गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला 4 षटकात 41 धावा देत बाहेरचा रस्ता दाखवेल. या सामन्यात हर्षल पटेलला भले 2 विकेट मिळाले असतील, पण त्यासाठी त्याने 41 धावा पाण्यासारख्या दिल्या. लेग-स्पिनर युझवेंद्र चहलला वगळून त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला घेईल, तर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसरा मोठा बदल केला जाईल.

वॉशिंग्टन सुंदर हा खालच्या ऑर्डरमध्ये घातक ऑफ-स्पिन गोलंदाजीसह स्फोटक फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात युझवेंद्र चहलने 2 षटकात 26 धावा दिल्या. यादरम्यान युझवेंद्र चहलला एकही विकेट मिळाली नाही. युझवेंद्र चहलचा इकॉनॉमी रेटही 13.00 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.