India vs Sri Lanka 3rd T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 सामना धर्मशालाच्या मैदानात रंगला आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर सपशेल अपयशी ठरला आहे. पहिल्या षटकापासूनच श्रीलंकेच्या विकेट्स पडण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकी भागीदारी करुन संघाला दमदार सुरुवात करुन देणारी श्रीलंकेटची सलामी जोडी पहिल्या षटकातच फुटली. आवेश खानने (Avesh Khan) मागच्या सामन्यात 75 धावांची दमदार खेळी करणाऱ्या निसांकाला (Pathum Nissanka) अवघ्या एका धावेवर माघारी धाडले.
भारताकडून दुसरे षटक घेऊन आलेल्या मोहम्मद सिराजनेही (Mohammad Siraj) श्रीलंकेवर आणखी एक घाव टाकला. त्याने दनुष्काला (Danushka Gunathilaka) खातेही उघडू दिले नाही. सिराजचा चेंडूवर हुक शॉट मारण्याचा दनुष्काचा प्रयत्न फसला. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला. पण बॅटची कड घेऊन चेंडू स्टम्पवर आदळला. पहिल्याच चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या नादात त्याने विकेट गमावली.
तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात उप कर्णधार जसप्रित बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्यात आलीये. त्यांच्या जागी खेळणाऱ्या आवेश खान आणि मोहम्मद सिराजनं नावाला साजेसा खेळ करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. श्रीलंकेच्या आघाडीला सुरुंग लावण्याचे काम या दोघांनी केले. त्यांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचे फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील विजयासह भारतीय संघाने मालिका आधीच खिशात घातली आहे. तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून ते श्रीलंकेला क्लिन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.