IND vs SL : भारतीय गोलंदाजांना देण्यात येणारे चेंडू तपासले पाहिजेत... पाकिस्तानच्या पोटात लागलं दुखायला

IND vs SL
IND vs SL esakal
Updated on

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात भारतीय गोलंदाजांनी लंकेची पळता भुई थोडी केली होती. वानखेडे स्टेडियममध्ये नवीन चेंडूवर आधी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने लंकेची टॉप ऑर्डर उडवली त्यानंतर मोहम्मद शामीने कहरच केला. त्याने एका पाठोपाठ एक धक्के देत लंकेचा निम्मा संघ गारद केला.

भारताच्या 357 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 55 धावात गारद झाला. भारताने सामना तब्बल 302 धावांनी जिंकत दिमाखात सेमी फायनलमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. मात्र पाकिस्तानला भारताचा हा भव्य दिव्य विजय काही पचनी पडला नाही. पाकिस्तानचा माजी खेळाडू हसन रझाने पाकिस्तानातील एका न्यूज चॅनलशी बोलताना भारतीय गोलंदाजांना देण्यात येणारा चेंडू तापसला पाहिजे असं वक्तव्य केलं.

IND vs SL
Virat Kohli Shubman Gill : हमारी भाभी कैसी हो... विराटनं प्रेक्षकांना दिला सल्ला अन् गिलची झाली गोची

रझा टीव्ही चॅनलवर म्हणतो, 'मला काही समजतच नाहीये फलंदाज इतर संघाविरूद्ध चांगलं खेळत आहेत. मात्र ज्यावेळी भारतीय गोलंदाज मोहम्मद शामी आणि सिराज गोलंदाजी करतात त्यावेळी आम्ही डोनाल्ड आणि एन्टिनीविरूद्ध खेळायचो तसं वाटतंय. त्यावेळी चेंडू स्विंग आणि सीम व्हायचा. इथं मला वाटतंय की दुसऱ्या इंनिंगमध्ये चेंडू बदलण्यात येतोय. ज्या प्रकारे आयसीसी, बीसीसीआय किंवा थर्ड अंपायर चेंडू देत आहेत ते तपासण्याची गरज आहे.'

पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने आपले अकलेचे तारे तोडले. तो म्हणतो की नवीन चेंडूमध्ये कोणताही टणकपणा नाहीये. भारतीय गोलंदाज वापरत असलेल्या चेंडूवर अतिरिक्त कोटिंग आहे का अशी देखील शंका व्यक्त केली.

IND vs SL
Ben Stokes Inhaler : इंग्रजांचा श्वास कोंडला; स्टोकसह अनेकांना आता इनहेलरचाच सहारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.