IND vs SL: गुवाहाटीत सापांसाठी केली खास तजवीज; नाही होणार संघाची पळापळ

गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर सामन्यादरम्यान कधी साप बाहेर येतो तर कधी जाते लाईट...
 india vs sri lanka snake repellents pest controllers
india vs sri lanka snake repellents pest controllers
Updated on

India vs Sri lanka ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे होणार आहे. भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू या सामन्यातून पुनरागमन करत आहेत. कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली आणि लोकेश राहुल ब्रेकनंतर टीम इंडियात सामील होतील. अशा परिस्थितीत ही मालिका अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे. या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीनेही ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

 india vs sri lanka snake repellents pest controllers
Kapil Dev : श्रीलंकेला झोडणाऱ्या सुर्याबद्दल कपिल यांची कडक प्रतिक्रिया, 'तो म्हणजे...'

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुपारी दीड वाजल्यापासून पहिला एकदिवसीय सामना खेळल्या जाणाार आहे. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर सामन्यादरम्यान कधी साप बाहेर येतो तर कधी लाईट जाते. मैदानावरील शेवटचा सामना 2 ऑक्टोबर 2022 रोजी झाला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान सामना एकदा नव्हे तर दोनदा थांबवावा लागला. पहिल्यांदा साप मैदानात शिरला, पुढच्या वेळी लाईट निघून गेली. अंधारामुळे खेळ थांबवावा लागला.

 india vs sri lanka snake repellents pest controllers
IND vs Sl: कर्णधार रोहित शर्मा टी-20 क्रिकेटला करणार अलविदा? पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

आसाम क्रिकेट असोसिएशनने यावेळी पूर्ण तयारी केली आहे. मैदानात साप येऊ नयेत यासाठी रसायनांचा वापर केला जात आहे. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आसाम क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षा म्हणाल्या की, आम्ही संपूर्ण स्टेडियमवर सर्पविरोधी रसायनांची फवारणी केली आहे. डासांना प्रतिबंध करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. याआधी 2020 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा टी-20 सामना खेळपट्टीत पाणी शिरल्यामुळे रद्द करण्यात आला होता. तेव्हा हेअर ड्रायर, इस्त्री यांसारख्या गोष्टींनी पिच कोरडे झाल्याचे चित्र जगाने पाहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.