Wi vs Ind: पहिल्याच सामन्यात यशस्वी-रोहित जोडीनं केलेत मोठे कारनामे! जाणून घ्या सगळे विक्रम एका क्लिकवर

yashasvi jaiswal rohit sharma
yashasvi jaiswal rohit sharma
Updated on

India vs West Indies 1st Test : वेस्ट इंडिज विरुद्ध डॉमिनिका कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने बॅटने कहर केला. त्याने शतकी खेळी खेळून ऐतिहासिक विक्रमांची धमाल केली. त्याच्यासोबत कर्णधार रोहित शर्मानेही कॅरेबियन गोलंदाजांना चांगलीच क्लास लावली आणि आपले शतकही पूर्ण केले.

परदेशात कसोटी पदार्पणात शतक ठोकणारा यशस्वी जैस्वाल हा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. याशिवाय त्याने या कसोटीत असे अनेक विक्रम केले, ज्यामुळे त्याची नोंद आता क्रिकेट इतिहासाच्या पानांमध्ये झाली आहे.

टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथे खेळला जात आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात 2 बाद 312 धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (143) आणि विराट कोहली (36) नाबाद आहेत.

yashasvi jaiswal rohit sharma
Team India : रिंकू सिंगला अचानक आनंदाची बातमी, BCCI ने वनडे संघात केला समावेश

वेस्ट इंडिजवर 162 धावांची भक्कम आघाडी

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच दिवशी संपूर्ण संघ 150 धावांवर बाद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने यजमान संघ वेस्ट इंडिजवर आतापर्यंत पहिल्या डावात 162 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघासाठी पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने 221 चेंडूत 103 धावांची शतकी खेळी केली.

तर युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वीने 350 चेंडूत नाबाद 143 धावा केल्या. यादरम्यान त्याने 14 चौकार मारले. या खेळीसह यशस्वीने अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

yashasvi jaiswal rohit sharma
Yashasvi Jaiswal WI vs IND : तब्बल 350 चेंडू खेळून नाबाद! यशस्वीची भूक मोठी; आधी रोहित आता विराटसोबत रचतोय भागीदारी

परदेशी भूमीवर शतक झळकावणारा पहिला भारतीय सलामीवीर

परदेशी भूमीवर सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा यशस्वी पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी सुधीर नाईकने इंग्लंडमध्ये (1974) 77 धावा केल्या होत्या. तर सुनील गावसकर यांनी पदार्पणाच्या डावात 65 धावा केल्या. एकंदरीत शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पदार्पणाच्या कसोटीत सलामीवीर म्हणून शतके झळकावली आहेत. पण हे शतक भारतात आले आहे.

याशिवाय पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा यशस्वी एकूण भारतीयांपैकी 17वा फलंदाज ठरला आहे. म्हणजेच त्याच्या आधी भारताच्या 16 फलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले आहे. जर आपण सर्वोत्तम धावसंख्येबद्दल बोललो, तर पदार्पणाच्या कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम धवनच्या नावावर आहे, ज्याने मार्च 2013 मध्ये मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 187 धावा केल्या होत्या. तिसर्‍या दिवशीही यशस्वी खेळाला सुरुवात करेल, अशा परिस्थितीत हा विक्रमही मोडू शकतो.

yashasvi jaiswal rohit sharma
Wi vs Ind: 'पाणीपुरी विकण्यापासून ते स्टार बनण्यापर्यंतचा प्रवास...' पदार्पणाच्या कसोटीत यशस्वी ठोकले शतक अन्...

कसोटी पदार्पणात शतक झळकावणारे सर्वात तरुण भारतीय

  • 18 वर्षे 329 दिवस - पृथ्वी शॉ विरुद्ध वेस्ट इंडिज, 2018

  • 20 वर्षे 126 दिवस - अब्बास अली बेग विरुद्ध इंग्लंड, 1959

  • 20 वर्षे 276 दिवस - गुंडप्पा विश्वनाथ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1969

  • 21 वर्षे 196 दिवस - यशस्वी जैस्वाल विरुद्ध वेस्ट इंडीज, 2023

  • 21 वर्षे 327 दिवस - मोहम्मद अझरुद्दीन विरुद्ध इंग्लंड, 1984

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावणारे भारतीय

  • 177- रोहित शर्मा, कोलकाता, 2013

  • 134 - पृथ्वी शॉ, राजकोट, 2018

  • 143* धावा - यशस्वी जैस्वाल, रोसीयू, 2023

पदार्पण करताच सचिनचा मोडला विक्रम

यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 80.21 च्या मजबूत सरासरीसह टीम इंडियामध्ये कसोटी पदार्पण करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. जेव्हा सचिनने भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यावेळी त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरासरी 70.18 होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 88.37 च्या सरासरीने सर्वाधिक धावा करून कसोटी पदार्पण करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर आहे.

yashasvi jaiswal rohit sharma
Yashasvi Jaiswal : 'हे फक्त माझ्या आई-वडिलांसाठी...' पदार्पणाच्याच सामन्यात शतक ठोकल्यानंतर जैस्वालचे डोळे पाणावले

पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारे भारतीय खेळाडू

  • शिखर धवन - 187 धावा

  • रोहित शर्मा - 177 धावा

  • यशस्वी जैस्वाल - 143* धावा

  • गुंडप्पा विश्वनाथ - 137 धावा

  • पृथ्वी शॉ - 134 धावा

  • सौरव गांगुली - 131 धावा

  • सुरिंदर अमरनाथ - 124 धावा

  • सुरेश रैना - 120 धावा

  • लाला अमरनाथ - 118 धावा

  • अब्बास अली बाग - 112 धावा

  • दीपक शोधन - 110 धावा

  • मो. अझरुद्दीन - 110 धावा

  • हनुमंत सिंग - 105 धावा

  • वीरेंद्र सेहवाग - 105 धावा

  • श्रेयस अय्यर - 105 धावा

  • प्रवीण अमरे - 103 धावा

  • किरपाल सिंग - 100* धावा

यशस्वी-रोहितने 21 वर्षे जुन्या भागीदारीचा विक्रम मोडला

रोहित आणि यशस्वी यांनी भागीदारीचा विक्रमही केला आहे. दोघांनी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय सलामीची सर्वात मोठी भागीदारी केली आहे. या सामन्यात रोहित आणि यशस्वी यांनी 229 धावांची सलामी दिली. अशाप्रकारे त्याने वीरेंद्र सेहवाग आणि संजय बांगर यांचा विक्रम मोडला आहे, ज्यांनी 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत 201 धावांची सलामी दिली होती.

yashasvi jaiswal rohit sharma
Team India : रिंकू सिंगला अचानक आनंदाची बातमी, BCCI ने वनडे संघात केला समावेश

जैस्वालने मोडला गांगुलीचा विक्रम

सौरव गांगुलीने 1996 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 131धावा केल्या होत्या. आता जैस्वाल नावावर परदेशात पदार्पण करणाऱ्या भारतीयाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.

एकही विकेट न गमावता डावात आघाडी घेण्याचा विक्रम

टीम इंडियाने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता आघाडी घेतली. या सामन्यापूर्वी 1978 च्या सिडनी कसोटीत हा प्रकार घडला होता. जिथे ऑस्ट्रेलियाचा डाव 131 धावांवर संपुष्टात आल्यानंतर गावसकर आणि चौहान यांच्यात 97 धावांची भागीदारी झाली होती.

2008 नंतर सलामीवीरांनी ठोकले शतके

रोहित आणि यशस्‍वीपूर्वी फिल जॅक आणि सायमन कॅटिच यांनी 2008 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या ब्रिजटाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात शतके झळकावली होती. त्यानंतर, विंडीजविरुद्धच्या एकाच कसोटी डावात सलामीवीर फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.