IND vs WI 2nd ODI : नवा प्रयोग, रोहितसोबत पंत ओपनिंगला; पण...

Rishabh Pant Opening with Rohit
Rishabh Pant Opening with Rohit Sakal
Updated on

India vs West Indies, 2nd ODI : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीज संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या टीम इंडियाने सलामीला मोठा आणि अनपेक्षित बदल केल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माने यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. पण पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी फिरला. (Rishabh Pant Opening with Rohit)

भारतीय वरिष्ठ संघातून (Team India) चौथ्या-पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या रिषभ पंतने (Rishabh Pant) अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत ओपनिंग केली होती. 11 सामन्यात डावाची सुरुवात करताना त्याने 41.27 च्या सरासरीनं 454 धावा केल्या आहेत. यात त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके ठोकली आहेत. पंतला ओपनिंगला पाठवण्याचा प्रयोग हा भविष्यातील टीम बांधणीसाठीच्या रणनितीचा एक भाग असू शकते.

Rishabh Pant Opening with Rohit
NZ v IND: स्मृती मानधना संघाबाहेरच; भारताला मोठा धक्का
Rishabh Pant Opening with Rohit
Winter Olympics: अमेरिकन - चिनी आयलीनच्या सुवर्णपदकाने चिनी सोशल मीडिया झाला क्रॅश

वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितनं युवा आणि डावखुऱ्या ईशान किशनच्या साथीनं डावाची सुरुवात केली होती. शिखर धवनच्या अनुपस्थितीत लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनच्या रणनितीचा भाग म्हणून ईशानला संधी दिल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या वनडेत लोकेश राहुलची संघात एन्ट्री झाली. त्यामुळे ईशान किशनला बाकावर बसवण्यात आले. तोच रोहितसोबत संघाच्या डावाची सुरुवात करेल, अशी अपेक्षा होती. पण त्याला मध्यफळीत ट्राय करण्याचा प्लॅन टीम इंडियाच्या नव्या कर्णधारासह टीम व्यवस्थापनामध्ये शिजल्याचे समोर आले. आगामी वर्ल्ड कपचा विचार करुन संघ बाधणीत हा प्रयोग करण्यात आल्याचे दिसते.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहेत. पहिल्या सामना जिंकून भारतीय संघाने पाहुण्या संघाविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा वनडे सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसऱ्या बाजूला पोलार्डच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघ या सामन्यातील विजयासह मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.