IND vs WI: ऐतिहासिक कामगिरी! टीम इंडियाचा विंडीजवर शानदार 119 धावांनी विजय

IND vs WI : भारताने वेस्ट इंडिजला त्याच्या भूमीवर प्रथमच केले क्लीन स्वीप
India crush West Indies by 119 runs
India crush West Indies by 119 runssakal
Updated on

India vs West Indies 3rd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळल्या गेला. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 119 धावांनी (DLS Method) पराभव करत भारताने 3-0 ने मालिका खिशात घातली. शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे शुभमन गिलच्या कारकिर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. शुभमन गिलच्या नाबाद 98 धावांच्या जोरावर भारताने 36 षटकांत 225 धावा केल्या.

India crush West Indies by 119 runs
WI vs IND : शुभमन गिलच्या पहिल्या वहिल्या शतकात पावसाचा खोडा

वेस्ट इंडिजला पावसामुळे DLS Method नुसार 35 षटकांत विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य मिळाले. धावसंख्येचा पाठलाग करताना संपूर्ण संघ 137 धावांत गारद झाला. भारताकडून युझवेंद्र चहलने चार, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येकी एक विकेट मिळाली. शुभमन गिलने 98 चेंडूत दोन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने नाबाद 98 धावांची खेळी केली. त्याने कर्णधार शिखर धवन (58) सोबत पहिल्या विकेटसाठी 113 आणि दुसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर (44) सोबत 86 धावांची भागीदारी केली. सामनावीर व्यतिरिक्त त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

India crush West Indies by 119 runs
BCCI च्या कॅम्पसाठी नाशिकच्या ईश्वरीची निवड, लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली गिरवणार धडे

शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गिलच्या साथीने धवनने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी मिळून 113 धावांची भागीदारी केली. धवनला बाद करून भारताला पहिला धक्का वॉल्शने दिला. धवन वैयक्तिक 58 धावा करून बाद झाला. यानंतर पावसामुळे दोन तास खेळ खोळंबला. पाऊस थांबल्यानंतर भारताने श्रेयस अय्यर (44) आणि सूर्यकुमार यादव (8) यांच्या रूपाने आणखी दोन विकेट गमावल्या. दुसऱ्यांदा पाऊस थांबला तेव्हा गिल 98 धावांवर परतला, भारतीय डाव पावसाच्या पावसात संपुष्टात आला आणि विंडीजला 257 धावांचे लक्ष्य मिळाले.

लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात दोन धक्के देत यजमानांना बॅकफूटवर ढकलले. ब्रेंडन किंग आणि निकलोस पूरनने प्रत्येकी 42 धावा केल्या तर शे होपने 22 धावा केल्या. या तिघांशिवाय विंडीजच्या एकाही फलंदाजाला 10 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.