किंग कोहलीचा भोपळा; 7 वर्षांत पहिल्यांदा आली अशी वेळ!

Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

India vs West Indies, 3rd ODI : वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. अल्झारी जोसेफनं त्याला खातेही उघडू दिले नाही. किंग कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर क्षणातच ट्विटरवर Duck हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. या हॅशटॅगच्या माध्यमातून नेटकरी त्याची धुलाई करत आहेत. 2015 नंतर पहिल्यांदाच वनडे मालिका अर्धशतकाशिवाय अशी वेळ विराट कोहलीवर आली आहे. पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीनं 4 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 8 धावा केल्या होत्या. दुसऱ्या वनडेत तो 18 करुन माघारी फिरला. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात तो दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन वनडेत अल्झारी जोसेफ याने Alzarri Joseph त्याची विकेट घेतली. (Virat Kohli Duck first time he failed score a fifty in an ODI series since June 2015)

घरच्या मैदानावर पाहुण्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने मालिका आधीच खिशात घातली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वनडेत ज्या कर्णधाराने टॉस जिंकला त्याने पहिल्यांदा बॅटिंगला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले.

Virat Kohli
IPL 2022 Auction: जाफर प्रितीच्या पंजाबला म्हणाला 'दुआओं में याद रखना'

रोहितने मालिकेत दुसऱ्यांदा टॉस जिंकला. पण तो संघाला दमदार खेळी करुन देण्यात अपयशी ठरला. तिसऱ्या वनडेत नव्या पार्टनरसह मैदानात उतरलेल्या रोहित शर्माला अल्झारीनं बोल्ड केलं. तो अवघ्या 13 धावा करुन बाद झाला. चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. त्याने पहिला चेंडू निर्धाव खेळला आणि दुसऱ्या चेंडूवर शाई होपच्या हाती झेल देऊन हजरी लावून परतला. स्मिथनं धवनलाही 10 धावांवर तंबूत धाडत भारतीय संघाला सुरुवातीलाच धक्यावर धक्के दिले.

Virat Kohli
वनडेतून वगळण्यावर रहाणेनं ठेवले बोट; तुम्ही घरात बसून धावा करू शकत नाही!

किंग कोहली विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रम मोडीत काढून क्रिकेट जगतात एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करेल, अशी चर्चा रंगत असताना मागील मोठ्या काळापासून तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरताना दिसतोय. 2015 नंतर पहिल्यांदा एखाद्या मालिकेत त्याला आता अर्धशतकही करता आले नाही. ही गोष्ट त्याच्या शतकाकडे डोळे लावून बसलेल्या त्याच्या चाहत्यांचा हिरमोड करणारी अशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.