WI vs IND Series: यजमान करणार पलटवार? कसोटी मालिका संपली आता ODI मालिका, जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

WI vs IND ODI Series Schedule
WI vs IND ODI Series Schedulesakal
Updated on

WI vs IND ODI Series Schedule : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली आहे. मालिकेतील शेवटचा सामना पावसात वाहून गेला. अशा स्थितीत टीम इंडियाने कसोटी मालिका 1-0 अशी आपल्या नावावर केली.

आता दोन्ही संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येणार आहेत. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिकेचे वेळापत्रक आणि वेळ काय आहे. याबद्दल जाणून घ्या...

WI vs IND ODI Series Schedule
WI vs IND: ODI मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा! दोन दिग्गज खेळाडूचा पत्ता कट, यांना मिळाली संधी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे. दुसरा सामनाही याच मैदानावर होणार आहे, जो शनिवार 29 जुलै रोजी होणार आहे. यानंतर दोन्ही संघ मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी त्रिनिदादला जातील, जिथे एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 1 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. टी-20 मालिकेतील पहिला सामनाही येथे होणार आहे.

WI vs IND ODI Series Schedule
Wi vs Ind: दुसरी कसोटी अनिर्णित होताच रोहितला मोठा धक्का! WTC पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाचं मोठं नुकसान

भारतीय वेळेनुसार सामना कधी आणि कोणत्या वेळी सुरू होईल हे जाणून घेणे देखील तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. स्थानिक वेळेनुसार, सामना सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल, परंतु त्यावेळी भारतात संध्याकाळी 7 वाजले असतील. सामन्यात नाणेफेक साडेसहा वाजता होणार आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका

  • पहिला एकदिवसीय - 27 जुलै - बार्बाडोस

  • दुसरी वनडे - 29 जुलै - बार्बाडोस

  • तिसरी एकदिवसीय - 1 ऑगस्ट - त्रिनिदाद

    (तीनही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील)

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. कसोटी मालिका संपली आणि अजून 8 सामने बाकी आहेत. आता यजमान पलटवार करू शकतात का हे पाहायचे आहे. तथापि तुमच्यासाठी एक गोष्ट जाणून घेणे महत्त्वाचे आहे की वेस्ट इंडिजचा संघ पात्रता फेरीत हरल्यानंतर 2023 च्या विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.