IND vs WI Schedule Live Streaming : भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये WTC ची फायनल खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धची ही फायनल ओव्हलवर होत आहे. यानंतर भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. क्रीकबझने या दौऱ्याचे संपूर्ण शेड्युल जाहीर केले आहे. बीसीसीआयकडून याबाबत अजून अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र क्रिकबझच्या माहितीनुसार ही मालिका 12 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या दौऱ्यातील सर्व सामना जिओ सिनेमावर मोफत पाहता येणार आहे.
इनसाईड स्पोर्ट्स या वेब पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलनंतर जिओ सिनेमाने हजारो सबस्क्राईबर गमावले होते. याबाबत क्रिकबजने ड्रीम स्पोर्ट्स एक्सिक्युटीव्ह यांचे वक्तव्य छापले. या वक्तव्यात ते म्हणातात की, 'आम्ही या मालिकेसाठी वेगवेळ्या स्तरावर तयारी करत आहोत. हे सामने फॅनकोडवर उपलब्ध असणार आहेत. आम्ही कंटेट हा इतर काही प्लॅटफॉर्मशी शेअर करणार आहोत. यात टीव्ही आणि डिजीटल दोन्ही प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.'
विशेष म्हणजे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ही मालिका डीडी स्पोर्ट्सवर देखील पाहता येणार आहे. ड्रीम स्पोर्ट्स हे टीव्ही ब्रॉडकास्टसाठी दूरदर्शनशीही बोलत आहे. गेल्यावेळी भारताने वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. त्यावेळी त्या दौऱ्यातील सामने हे डीडी स्पोर्ट्सवर दाखवण्यात आली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका पुढे ढलण्याचा जवळपास निर्णय झाला आहे. रोहित शर्माच्या संघाला वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी जवळपास एक महिना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडीज दौऱ्याची तारीख अजून निश्चिच झाली नसली तरी क्रीकबझने ही मालिका कधी सुरू होईल याचा अंदाज वर्तवला आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना हा 12 जूनला सुरू होईल. तर मालिकेतील शेवटचा टी 20 सामना हा अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवाला जाईल.
भारतीय चाहत्यांच्या दृष्टीने महत्वाची बातमी ही आहे की या मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमावर होणार आहे. वेस्ट इंडीज क्रिकेटचे प्रक्षेपणाचे हक्क हे फॅनकोडकडे आहेत. ड्रीम स्पोर्ट्सची ही फॅनकोड मातृसंस्था आहे.
- पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
- दुसरा कसोटी सामना 20 ते 24 जुलै, त्रिनिदाद
- पहिला वनडे सामनना 27 जुलै, बार्बाडोस
- दुसरा वनडे सामना 29 जुलै, बार्बाडोस
- तिसरा वनडे सामना 1 ऑगस्ट, त्रिनिदाद
- पहिला टी 20 सामना 4 ऑगस्ट, त्रिनिदाद
- दुसरा पहिला टी 20 सामना 6 गयाना
- तिसरा पहिला टी 20 सामना 8 गयाना
- चौथा पहिला टी 20 सामना 12 फ्लोरिडा
- पाचवा पहिला टी 20 सामना 13 फ्लोरिडा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.