India vs Zimbabwe T20 World Cup : भारताने झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव करत ग्रुप 2 च्या अव्वल स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानने बांगलादेशला हरवून 6 गुण घेत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र भारताने झिम्बाब्वाचा पराभव करत आपली गादी पुन्हा मिळवली. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताने त्यांचा डाव 115 धावात गुंडाळला.
भारताने सुपर 12 फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरूद्ध आक्रमक सुरूवात केली. मात्र मधल्या षटकात भारताच्या पाठोपाठ तीन विकेट पडल्याने भारत अडचणीत आला होता. मात्र सूर्यकुमार यादवने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिला. सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 61 धावा ठोकत भारताला 186 धावांपर्यंत पोहचवले.
भारताचे वेगवान गोलंदाज झिम्बाब्वेला एका पाठोपाठ एक धक्के देत असताना अश्विननेही झिम्बाब्वेला तीन धक्के दिले. त्याने 22 चेंडूत 35 धावा करणाऱ्या रेयान बर्लला 14 व्या षटकात बाद केले. त्यानंतर 16 व्या षटकात मसाकाद्झा आणि नगारावाला प्रत्येकी 1 धावेवर बाद करत झिम्बाब्वेची अवस्था 8 बाद 106 धावा अशी केली.
भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेला दोन धक्के दिल्यानंतर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने देखील आपले विकेटचे खाते उघडले. पांड्याने क्रेग एर्विन (13) तर शमीने सेन विलियम्सला (11) बाद केले. यानंतर शमीने टोनी मोन्योंगाला 5 धावांवर बाद करत झिम्बाब्वेची अवस्था 5 बाद 36 धावा अशी केली.
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन षटकात झिम्बाब्वेला दोन धक्के दिले. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर विजली मॅधवरेला शुन्यावर बाद केले. तर अर्शदीप सिंगने देखील रेगिस चकाब्ववाला शुन्यावर बाद करत झिम्बाब्वेला दुसरा धक्का दिला.
हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने षटकार आणि चौकारांची बरसात करत 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर भारताने 20 षटकात 5 बाद 186 धावा केल्या. सूर्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला. सूर्याने 25 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या.
सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने अर्धशतकी भागीदारी रचल्यानंतर पांड्या 20 षटकात 18 चेंडूत 18 धावा करून बाद झाला.
सूर्यकुमार यादवने यंदाच्या वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला.
भारताने पाठोपाठ तीन विकेट गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी करत भारताला 18 व्या षटकात 150 धावांचा टप्पा पार करून दिला.
10 षटकानंतर भारताचे दोन सेट झालेले फलंदाज केएल राहुल आणि विराट कोहली हे मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. राहुल अर्धशतकानंतर लगेचेच परतला. मात्र नुकत्याच आलेल्या पंतनेही तीच चूक करत मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली.
पॉवर प्लेनंतर विराट कोहली आणि केएल राहुलने आपल्या आक्रमकपणाची धार अजून वाढवली. या दोघांनी भारताला 8 षटकात 68 धावांपर्यंत पोहचवल्यानंतर झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने 9 व्या षटकात फक्त 3 धावा देत भारताच्या धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल - विराटने 10 षटकात 8 धावा करत भारताला 79 धावांपर्यंत पोहचवले.
रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने येताक्षणीच आक्रमक सुरूवात केली. त्याला केएल राहुलने देखील चांगली साथ देत भारताला पॉवर प्लेमध्ये 46 धावांपर्यंत पोहचवले.
भारताचा कर्णधार रोहित शर्माला झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात देखील मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याला मुजारबानीने 15 धावांवर बाद केले.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या संघात एक बदल केला असून दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.