India vs Zimbabwe 2022 : आशिया कप सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वेला रवाना झाली आहे. भारताला झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना 18 ऑगस्टला खेळवला जाईल, तर इतर दोन सामने 20 आणि 22 ऑगस्टला होतील. केएल राहुल झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार असेल. यासाठी भारतीय संघ शुक्रवारी रवाना झाला. बीसीसीआयने ट्विटरवर प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण, शिखर धवन, दीपक चहर यांच्यासह अनेक खेळाडूंचे फोटो पोस्ट करून याची माहिती दिली.
बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी 31 जुलैला 15 जणांचा संघ जाहीर केला होता, त्यावेळी संघाची कमान शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. पण काही दिवसांपूर्वी केएल राहुलने तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण होऊन केवळ संघात स्थान मिळवले नाही, तर बीसीसीआयने त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवले आहे. या दौऱ्यावर आता धवन संघाचा उपकर्णधार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्यापूर्वी शिखर धवनने त्याच्या फेसबुक स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये तो विमानतळावर झोपलेला दिसत होता.
कर्णधाराशिवाय संघाचे प्रशिक्षकही या दौऱ्यापूर्वी बदलले आहेत. आशिया चषकापूर्वी नियमित प्रशिक्षक राहुल द्रविडला विश्रांती दिल्यानंतर बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणला मुख्य प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेला पाठवले आहे.
भारतीय संघ :
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज , दीपक चहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.