श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड; अर्ध्या टीमला कोरोनाची बाधा

indian cricket logo
indian cricket logoindian cricket logo
Updated on

वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला असून, सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) सामने खेळण्यासाठी सज्ज झाला असतानाच संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या तिघांचीच नावे समोर आलेली आहेत. यामुळे ६ फेब्रुवारीपासून सुरू होणारी एकदिवसीय सामन्यांची मालिकाही पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. (Indian Players Covid Positive)

भारतीय संघ सध्या (India) अहमदाबाद येथे सराव करीत आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम खेळाडूंची काळजी घेत आहे. दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतलेल्या खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. बाकीचे पाच सदस्य हे खेळाडू नसले तरी ते भारतीय संघाचाच एक भाग आहेत. हे पाचही जणं व्यवस्थापकीय टीममधील असल्याचे समजते.

indian cricket logo
नात्याला काळिमा! १६ वर्षांच्या मुलीवर बापाचा ५ वर्षांपासून बलात्कार

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील पहिला वनडे सामना सहा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी भारताच्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीत आठ खेळाडूंना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. परंतु, बीसीसीआयने अद्याप या खेळाडूंबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण काही वृत्तसंस्थांनी शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांना करोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) एकदिवसीय मालिकेसाठी संघात रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा व आवेश खान यांची निवड करण्यात आली आहे.

indian cricket logo
शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत ठेवले संबंध, नंतर केले लग्न; अशी झाली सुटका

सामन्यांचे वेळापत्रक (एकदिवसीय सामने)

  • ६ फ्रेबुवारी २०२२ - अहमदाबाद

  • ९ फेब्रुवारी २०२२ - अहमदाबाद

  • १२ फेब्रुवारी २०२२ - अहमदाबाद

टी-२० सामने

  • १५ फ्रेब्रुवारी २०२२ - कोलकाता

  • १८ फेब्रुवारी २०२२ - कोलकाता

  • २० फेब्रुवारी २०२२ - कोलकाता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.