India vs China LIVE : भारतीय संघ आशियाई 'King'! चीनला घरात घुसून लोळवले अन् पाचव्यांदा उंचावला चषक

Asian Champions Trophy 2024 : गतविजेत्या भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी नावावर केली.
India Hockey Team
India Hockey TeamSakal
Updated on

Asian Champions Trophy 2024 final: भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे पाचवे जेतेपद नावावर केले. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने अपराजित मालिका कायम राखताना फायनलमध्ये यजमानांचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. गतविजेत्या भारताला अंतिम सामन्यात सुरुवातीच्या सत्रांमध्ये चीनने कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या संघाने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. ५०व्या मिनिटापर्यंत चीनच्या खेळाडूंनी भारताला कडवी टक्कर दिली होती, परंतु कर्णधार हरमनप्रीत सिंग गोल सेट केला आणि जुगराज सिंगने भन्नाट गोल केला. तोच गोल निर्णायक ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.