SAAF Junior Athletics Championships: दक्षिण आशियाई ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपच्या चौथ्या पर्वाचा आज जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर समारोप झाला. त्यात भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा मान पटकावला.
भारताने तीन दिवसीय स्पर्धेत २१ सुवर्ण, २२ रौप्य आणि ५ कांस्यपदकांसह ४८ पदके जिंकली, तर श्रीलंकेने ९ सुवर्ण, ९ रौप्य व १७ कांस्य एकूण ३५ पदके मिळवली.
या स्पर्धेमध्ये दक्षिण आशियातील ७ देशांतील भारत (६२ खेळाडू), श्रीलंका (५४ खेळाडू), पाकिस्तान (१२ खेळाडू), बांग्लादेश(१६ खेळाडू), नेपाळ(९ खेळाडू), भूतान(५ खेळाडू), आणि मालदीव (१५ खेळाडू) खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी पाकिस्तान व भूतानला भोपळा मिळाला असून पदकतालिकेमध्ये भारत अग्रस्थानी, तर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत (४८), श्रीलंका (३५), पाकिस्तान (०), बांग्लादेश(३), नेपाळ(१), भूतान(०), आणि मालदीव (२) या देशांची अशी पदकांची कमाई राहिली.
भारताची महिला भालाफेकपटू दीपिका आज पुन्हा एकदा चमकली. तिने विक्रमी ५४.९८ मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले, तर भारताच्या पूनमने ५१.२१ मीटरचा भाला फेकत रौप्यपदक मिळवले.
योगायोगाने, दोन्ही भालाफेकपटूंना हनुमान सिंग यांनी प्रशिक्षित केले होते. आपल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर खुष होत हनुमान सिंग म्हणाले, "दीपिका आणि पूनमसाठी खूप आनंद झाला आहे. दीपिकाने सर्वत्र विक्रम मोडले आहेत आणि तिने आज स्पर्धा विक्रमही मोडला आहे. पूनम ही नवोदित खेळाडू आहे, तिने फक्त दोन वर्षांपासून प्रशिक्षण घेतले आणि आज तिने अप्रतिम कामगिरी केली."
महिला:
२०० मीटर शर्यत:
उन्नाथी अयप्पा (भारत) , नॅन्सी (भारत), नीरू पहतक (भारत)
१५०० मीटर शर्यत:
विनीता गुर्जर (भारत), लक्षिता विनोद संदिले (भारत), टी के जी एच दुलांजी (श्रीलंका)
गोळाफेक:
तमन्ना (भारत), पूजा कुमारी (भारत), एच इसाली मलकेथमी (श्रीलंका)
भालाफेक:
दीपिका (भारत), पूनम (भारत), डब्ल्यू जी निसानसाला (श्रीलंका)
४X१०० मीटर रिले:
भारत (नॅन्सी, अबिनाया राजराजन, एन कॉर्नेलिओ, व्ही सुधीक्षा), श्रीलंका (एच सिथमिनी रणसगल, पी रॅन्सिनी परेरा, के शानानी रश्मा, एस शानेला ॲन), मालदीव (हवा मुझन्ना फैज, झिवा मूसा शफीयू, अहिन्ना निझार, मरियम आरयू).
४X४०० मीटर रिले:
भारत (संचिन सांगले, सँड्रा मोल साबू, कनिस्ता टीना, नीरू पाहतक), श्रीलंका (ए विजेथुंगा, जी शशिनी भाग्य, डी प्रविंदी, के तक्षिमा), बांगलादेश (नुसरत जहाँ रुना, आझमी के, मीम अक्तर, सुमैया अक्तर).
पुरुष:
२०० मीटर शर्यत:
आर इंदुसारा विंदुशन (श्रीलंका), प्रतीक महाराणा (भारत), डब्ल्यू एम कौशन थामेल (श्रीलंका).
१५०० मीटर शर्यत:
प्रियांशू (भारत), राहुल सरनालिया (भारत), एम प्रशन बुद्दीका (श्रीलंका).
तिहेरी उडी:
डी एम एच कविंदा (श्रीलंका), एम डी एस हंसका (श्रीलंका), मो. तमीम हुसेन (बांगलादेश).
भालाफेक:
रोहन यादव (भारत), दीपांशु शर्मा (भारत), यू जी बी धिल्हारा (श्रीलंका).
४x१०० मीटर रिले:
श्रीलंका (डब्ल्यू एम कौशन, आर विदुषण, डब्ल्यू दिनेथ इंदुवारा, डब्ल्यू मेरोन ज्युलियन), भारत (प्रतिक महाराणा, महेंद्र सांता, कार्तिकेयम एस, डी मृत्युम), मालदीव (हुसेन झीक सुआद, एम झेडयू आयझेड सुआद, आय निझार, एम शमीन).
४x४०० मीटर रिले:
श्रीलंका (यु नेथसरा, जथ्या किरुलू, जे शाशिंथा सिल्वा, एस राजकरूना), भारत (अभिराम पी, विनोद कुमार बनोथ, अंकुल, जय कुमार), बांगलादेश (बी शेख, मोहम्मद हाफिजुर रमन, एम अल सोबूर, मो. अस्लम सिकंदर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.