INDW vs SLW : भारतीय महिला संघाने लंकेविरूद्धचा पहिला टी 20 सामना जिंकला

India Women Cricket Team Defeat Sri Lanka Women Cricket Team In 1st T20 Match
India Women Cricket Team Defeat Sri Lanka Women Cricket Team In 1st T20 Match ESAKAL
Updated on

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यातील पहिला टी 20 सामना भारताने 34 धावांनी जिंकला. श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात 138 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेला 20 षटकात 5 बाद 104 धावात रोखत सामना खिशात टाकला. भारताकडून शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्जने चांगली फलंदाजी केली. भारताने आता तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. (India Women Cricket Team Defeat Sri Lanka Women Cricket Team In 1st T20 Match)

India Women Cricket Team Defeat Sri Lanka Women Cricket Team In 1st T20 Match
BCCIचा महिला संघाशी भेदभाव! लंकेविरूद्धच्या सामन्याचे प्रक्षेपण होणार नाही?

भारताची नवी कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची अव्वल सलामीवीर स्मृती मानधना 1 धावेवर बाद झाली. तर सभिनेनी मेघना शुन्यावर बाद झाली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौरने डाव सावरत संघाला अर्धशतक पार करून दिले. मात्र 31 चेंडूत 31 धावा करणारी शेफाली बाद झाली. पाठोपाठ हरमनप्रीत कौर देखील 22 धावा करून माघारी फिरली.

कौर आणि शेफाली बाद झाल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जने 27 चेंडूत 36 धावांची खेळी केली. तिला रिचा घोषने 11 तर पूजा वस्त्राकर (14) आणि दिप्ती शर्माने (17) ने चांगली साथ दिली. भारताने श्रीलंकेच्या नियंत्रित माऱ्यासमोर 6 बाद 138 धावा केल्या. श्रीलंकेकडून रनवीराने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

India Women Cricket Team Defeat Sri Lanka Women Cricket Team In 1st T20 Match
VIDEO : बुमराहचा बॉल नको त्या ठिकाणी लागला अन् रोहित खालीच बसला

त्यानंतर भारताच्या 138 धावांच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या श्रीलंकेचा डाव भारताने 104 धावात गुंडाळला. श्रीलंकेकडून कविशा दिलहारीने 47 धावांची झुंजार खेळी करत कडवा प्रतिकार केला. मात्र राधा यादवने 2 तर शेफाली वर्मा, पूजा वस्त्राकर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत लंकेच्या धावगतीला ब्रेक लावला. त्यामुळे लंकेला 20 षटकात 5 बाद 104 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.