Pink Ball Test: भारतीय महिला संघही 'प्रकाशझोतात'

भारतीय महिला क्रिकेट या वर्षी ऑस्ट्रेलियात आपला पहिला डे नाईट सामन खेळेल,
test cricket
test cricketFile Photo
Updated on

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेटचे वेळापत्रक पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्नशील दिसते. पुरुष क्रिकेट टीमसोबतच महिला क्रिकेटलाही पोत्साहित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारतीय महिला संघ सात वर्षानंतर इंग्लंड दौऱ्यावर कसोटी खेळण्यासाठी सज्ज असताना महिला क्रिकेटसाठी बीसीसीआयने आणखी एक मोठे सरप्राइज दिलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या मैदानात पहिला डे नाईट कसोटी सामना खेळणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केली. (india women criket team play first pink ball test in australia says BCCI)

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या मैदानात ऐतिहासिक पिंक बॉल टेस्ट खेळणार असल्याची माहिती जय शहा यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, 'महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतीय महिला क्रिकेट या वर्षी ऑस्ट्रेलियात आपला पहिला डे नाईट सामन खेळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

test cricket
'फ्लाइंग शीख'ला कोरोनाची लागण

सध्याच्या घडीला भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झालाय. 2 जूनला भारतीय पुरुष संघासोबतच महिला संघही इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ एका कसोटी सामन्यासह मर्यादित सामन्यांची मालिका खेळेल. मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी इंग्लंड दौऱ्यासाठी चार्टड प्लेन उपलब्ध करुन दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत प्रवास करणे आव्हानात्मक आहे. बीसीसीआयने आमच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य दिले असून मुंबईला रवाना होण्यापूर्वी घरी असताना नियमित आरटी-पीसीआर टेस्‍ट झाल्याची माहिती मितालीने ट्विटच्या माध्यमातून दिलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.