INDW vs ENGW : w,w,w,w,w दिप्तीने इंग्रजांच कंबरडं मोडलं; हरमनने फॉलो ऑन न देता जखमेवर मीठ चोळलं

INDW vs ENGW
INDW vs ENGW esakal
Updated on

INDW vs ENGW : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. इंग्लंड सारख्या तगड्या संघाला पहिल्या डावात 136 धावात गुंडाळले. भारताने पहिल्या डावात 292 धावांची दमदार आघाडी घेतली.

विशेष म्हणजे पहिल्या डावात 428 धावा करूनही इंग्लंडला फॉलो ऑन दिला नाही. भारताकडून दिप्ती शर्माने 5 विकेट्स घेतल्या. तिने फक्त 5.3 षटके टाकली त्यातील 4 षटके निर्धाव होती. दिप्तीने 7 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या.

INDW vs ENGW
IND U19 vs BAN U19 : सरफराज खानच्या भावाने भारताचा डाव सावरला; मुरगन अभिषेकने दिली साथ

भारताने पहिल्या दिवशी 7 बाद 410 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारताचे पहिला डाव 428 धावात संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने आपला पहिला डाव सुरू करत 3 बाद 79 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडची टॉप ऑर्डर ठराविक अंतराने बाद होत असताना नॅट सिव्हर ब्रंटने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

तिने अर्धशतकी खेळी तर इंग्लंडला शतकी मजल मारून दिली होती. मात्र त्यानंतर दिप्ती शर्माने भेदक मारा करत एका पाठोपाठ एक इंग्लंडच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इंग्लंडची अवस्था 4 बाद 108 धावांवरून सर्वबाद 136 धावा अशी झाली. इंग्लंडकडून नॅट सिव्हर ब्रंटने सर्वाधिक 59 धावा केल्या.

INDW vs ENGW
Vrinda Rathi : नवी मुंबईच्या वृंदा राठीनं इतिहास रचला; भारत - इंग्लंड कसोटी सामन्यातील विक्रमांमध्ये अजून एकाची भर

भारताने पहिल्या डावात 292 धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतर आपला दुसरा डाव सुरू केला. भारताने बिनबाद 61 धावा केल्यानंतर भारताला तीन धक्के बसले. स्मृती मानधना 26, शेफाली वर्मा 33 आणि यस्तिका भाटिया 9 धावा करून बाद झाली. भारताने आतापर्यंत 19 षटकात 3 बाद 88 धावा केल्या आहेत.

सध्या क्रीजवर कर्णधार हमनप्रीत कौर 2 तर जेमिमाह रॉड्रिग्ज 10 धावा करून नाबाद आहेत. भारताची आघाडी 380 धावांपर्यंत पोहचली आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()