महिला क्रिकेटमध्ये कुणाला किती पॅकेज; पाहा संपूर्ण यादी

मध्यफळीतील फलंदाज वेदा कृष्णमूर्ती मागील काही दिवसांपासून भारतीय महिला संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरली होती.
smriti mandhana
smriti mandhanae sakal
Updated on

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने (BCCI) नुकतेच महिला क्रिकेट टीमच्या वार्षिक कॉन्ट्रॅक्टची घोषणा केलीये. पुर्वीच्या करारामध्ये 22 सदस्यांच्या नावे होती. नव्या यादीत केवळ 19 जणींचाच सहभाग आहे. काही महिला खेळाडूंना प्रमोश मिळाले असून काहींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. कोरोनामुळे बहीण आणि आईला गमावलेल्या वेदा कृष्णमूर्तीचं नाव (Veda Krishnamurthy) बीसीसीआयने करारातून वगळलं आहे.

मध्यफळीतील फलंदाज वेदा कृष्णमूर्ती मागील काही दिवसांपासून भारतीय महिला संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरली होती. 2018 च्या महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेदा शेवटचा सामना खेळली होती. नियमित सदस्य नसल्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. दुसरीकडे युवा क्रिकेटर शफाली वर्माला प्रमोशन मिळाले आहे. तिला बी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे.

ए ग्रेडमधील खेळाडूंना मिळणारे पॅकेज आणि खेळाडू

क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना ए ग्रेडमध्ये स्थान दिले जाते. महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रित कौर, स्मृती मानधना आणि लेग स्पिनर पूनम यादव यांची नावे ए ग्रेडमध्ये आहेत. या कॅटेगरीत खेळाडूंना वर्षाला 50 लाख रुपये मिळतात.

smriti mandhana
smriti mandhanainstagram

ग्रेड बीमध्ये समावेश असणाऱ्या महिला खेळाडूंना वर्षाला 30 लाख रुपये मिळतात. अनुभवी आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राज या गटात आहे. तिच्याशिवाय झुलन गोस्वामी आणि दीप्ती शर्मासह पूनम राउत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया आणि जेमिमा रोड्रिग्ज यांचा यात समावेश आहे.

shafali varma
shafali varmainstagram

ग्रेड सी मध्ये असणाऱ्या महिला खेळाडूंना 10 लाख रुपये दिले जातात. या यादीत मानसी जोशी, अरूधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, हरलीन देओल, प्रिया पूनिया आणि ऋचा घोष यांचा समावेश आहे.

ए ग्रेड (वर्षाला 50 लाख रुपये)

1.हरमनप्रीत कौर

2. स्मृती मानधना

3. पूनम यादव

बी ग्रेड ( वर्षाला 30 लाख)

4. मिताली राज

5. झूलन गोस्वामी

6. दीप्ति शर्मा

7. पूनम राउत

8. राजेश्वरी गायकवाड

9. शेफाली वर्मा

10. राधा यादव

11. शिखा पांडे

12 तानिया भाटिया

13. जेमिमा रॉड्रिग्ज.

ग्रेड सी (10 लाख रुपये)

14. मानसी जोशी

15. अरूधती रेड्डी

16. पूजा वस्त्रकार

17. हरलीन देओल

18. प्रिया पूनिया

19. ऋचा घोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.