स्मृती मानधनाचा ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

या व्हिडिओमधील स्मृतीची झलक ठरतेय लक्षवेधी
Smriti Mandhana
Smriti MandhanaBCCI Twitter
Updated on

England Women vs India Women, 3rd ODI : मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने अखेरच्या षटकांपर्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात 4 विकेट राखून विजय मिळवला. रंगतदार अवस्थेत पोहचलेल्या सामन्यात ड्रेसिंग रुममध्ये स्मृती मानधना गोलंदाजी कशी होणार याचा अंदाज लावताना दिसली. बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात स्मृतीची झलक लक्षवेधी ठरतेय. (India Women tour of England 2021 Smriti Mandhana Dressing RoomVideo Viral)

पावसामुळे प्रत्येकी 47-47 षटकांच्या सामन्यात इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने भारतासमोर 220 धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने संघासाठी 49 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर कर्णधार मिताली राजने सलग तिसरे अर्धशतक झळकावून भारतीय संघाचा डाव सावरला.

Smriti Mandhana
VIDEO : स्मृतीनं घेतलेला जबऱ्या कॅच एकदा पाहाच

भारतीय संघाला 7 चेंडूत 6 धावांची आवश्यकता असताना स्नेह राणाच्या रुपात 46 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर भारतीय संघाला सहावा धक्का बसला. या विकेटमुळे सामन्यात आणखी रंगत आली. मिताली राजची साथ देण्यासाठी झुलन गोस्वामी मैदानात उतरली. 6 चेंडूत 6 धावांची गरज असताना मिताली स्ट्राईकवर होती. पहिल्या चेंडूवर मितालीला एक धाव मिळाली आणि गोस्वामी स्ट्राईकवर गेली.

दुसऱ्या चेंडुवर अनुभवी गोलंदाज गोस्वामीनं एक धाव घेत पुन्हा स्ट्राईक मितालीकडे दिले. बॉल टू रन अशी परिस्थिती निर्माण झाली असताना ड्रेसिंग रुममध्ये स्मृती मानधना ब्रंट चेंडू कसा टाकणार याचा अंदाज बांधताना दिसली. एक तर ती चंडू स्टम्पवर ठेवले नाहीतर चेंडू हार्ड लेंथवर टाकेल, असे स्मृती ड्रेसिंगरुममध्ये म्हणताना दिसली. तोपर्यंत तिसऱ्या चेंडूवर मितालीने चौकार खेचून सामना खिशात घातला. त्यानंतर स्मृतीसह संघातील सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.

Smriti Mandhana
वर्ल्ड रेकॉर्डसह महिला क्रिकेटमध्ये मितालीचं 'राज्य'

भारतीय संघाचे टी-20 मालिकेचे वेळापत्रक

-9 जुलै पहिला टी-20 सामना (नॉर्थम्टन) (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11 वाजल्यापासून)

-11 जुलै दुसरा टी 20 सामना (काउंटी ग्राउंड हावे) (भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजल्यापासून)

-15 जुलै तिसरा टी 20 सामना (चेम्सफोर्ड) (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11 वाजल्यापासून)

टी-20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व हे हरमनप्रित कौरकडे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.