CWG 2022 INDW vs BAW Live : रेणुका सिंह ठाकूरचा भेदक मारा; बार्बाडोसचा 100 धावांनी पराभव

India Women vs Barbados Women 10th Match Group A Live Cricket Score  Commonwealth Games Womens Cricket Competition 2022
India Women vs Barbados Women 10th Match Group A Live Cricket Score Commonwealth Games Womens Cricket Competition 2022esakal
Updated on

Commonwealth Games 2022 : भारताने ग्रुप अ च्या आपल्या अखेरच्या सामन्यात बार्बाडोसचा 100 धावांनी पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेची सेमी फायनल गाठली. भारताने ठेवलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बार्बाडोसचा संघ 8 फलंदाजांच्या मोबदल्यात 62 धावाच करू शकला. भारताकडून रेणुका सिंह ठाकूरने भेदक मारा करत 4 विकेट घेतल्या. तर फलंदाजीत भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने नाबाद 56 धावांची खेळी केली. तिला शेफाली वर्माने 43 धावांची आक्रमक खेळी करत साथ दिली.

32-5 : रेणुका सिंह ठाकूरचा भेदक मारा

वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूरने भेदक मारा करत बार्बाडोसच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. तिच्या या गोलंदाजीमुळे बार्बाडोसची अवस्था 5 बाद 32 अशी झाली. त्यात रेणुका सिंह ठाकूरच्या 4 विकेट्सचा वाटा आहे.

10-2 : रेणुकाने केली दुसरी शिकार

रेणुका ठाकूरने बार्बाडोसच्या हेले मॅथ्यूजला 9 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.

0-1 : रेणुका ठाकूरने पहिल्याच षटकात दिला धक्का

भारताची वेगवान गोलंदाज रेणू सिंह ठाकूरने पहिल्याच षटकात डिएंड्रा डॉट्टिनला शुन्यावर बाद करत बार्बाडोसला पहिला धक्का दिला.

जेमिमाह रॉड्रिग्जचे धडाकेबाज अर्धशतक

जेमिमाह रॉड्रिग्जने बार्बाडोस विरूद्ध 46 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. तिने दिप्ती शर्मा ( नाबाद 34 धावा ) च्या जोडीने पाचव्या विकेटसाठी 43 चेंडूत 70 धावांची भागीदारी रचली. यामुळे भारताला 20 षटकात 5 बाद 162 धावांपर्यंत मजल मारता आली.

92-4 : भारताला चौथ धक्का

तानिया भाटिया देखील 6 धावांची भर घालून माघारी

76-3 : हरमनप्रीतचा भोपळा; भारताला मोठा धक्का 

शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर आलेल्या हरमनप्रीत कौरला शेकारा सेलमनने शुन्यावर पायचीत पकडले.

76-2 : भारताला दुसरा धक्का

स्मृती मानधना बाद झाल्यानंतर सलामीवीर शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी करत 26 चेंडूत 43 धावा चोपल्या. मात्र ती अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच धावबाद झाली.

05-1 : स्मृती मानधना स्वस्तात माघारी

शानिका ब्रुशने भारताला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर स्मृती मानधनाला 5 धावांवर बाद केले.

बार्बाडोसने नाणेफेक जिंकली

बार्बाडोसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत सेमी फायनलचे स्थान पक्के करण्याच्या इराद्यात उतरणार

भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या ग्रुप स्टेजमधील अखेरच्या सामन्यात विजय मिळवून सेमी फायनल गाठण्यासाठी आज जोर लावणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.