Ind W vs Eng W: मंधानाचे शतक हुकले; भारताने पहिल्या ODI सामन्यात इंग्लंडचा केला पराभव

भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला विजयाने सुरुवात
smriti mandhana
smriti mandhana
Updated on

India Women vs England Women 1st ODI : महाराष्ट्राची स्मृती मानधना (९१ धावा), यास्तिका भाटिया (५० धावा ), कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद ७४ धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत यजमान इंग्लंडवर ७ गडी व ३४ चेंडू राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

smriti mandhana
Indian Team New Jersey : T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच, पहा Photo

इंग्लंडकडून मिळालेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताने फक्त तीन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. शफाली वर्मा १ धावेवर बाद झाल्यानंतर स्मृती व यास्तिका या जोडीने ९६ धावांची भागीदारी रचली व डाव सावरला. यास्तिका ५० धावांवर बाद झाली. या खेळीत तिने ८ चौकार व १ षटकार मारला. यानंतर स्मृती व हरमन या अनुभवी जोडीने ९९ धावांची भागीदारी करताना भारताचा विजय जवळपास निश्चित केला. स्मृतीचे शतक ९ धावांनी हुकले. केट क्रॉसच्या गोलंदाजीवर ती बाद झाली; पण तिने आपली खेळी १० चौकार व १ षटकाराने सजवली. हरमन (नाबाद ७४ धावा) व हर्लीन देओल ( नाबाद ६ धावा) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

smriti mandhana
Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला खेळवा - गौतम गंभीर

त्याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ हीथर नाईट व नॅट सीव्हर या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थिती या मालिकेत खेळत आहे. या लढतीत इंग्लंडच्या महिला संघातील फलंदाजांना सूर गवसला नाही. सोफीया डंकलीने २९ धावांची, डॅनी वॅटने ४३ धावांची, एलीस रिचर्डस् हिने नाबाद ५० धावांची खेळी साकारली. आठव्या क्रमांकावरील सोफी एक्लेस्टोनने ३१ धावांची व नवव्या क्रमांकावरील चार्ली डीन हिने नाबाद २४ धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला ५० षटकांत ७ बाद २२७ धावा तडकावता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.