IND vs WI: दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू! वेस्ट इंडिजला चारली पराभवाची धूळ

West Indies Women vs India Women
West Indies Women vs India Women
Updated on

West Indies Women vs India Women : टीम इंडियाच्या मुलींनी रविवारी अंडर-19 विश्वचषक जिंकून इतिहास रचला. याच्या एका दिवसानंतर भारताच्या वरिष्ठ खेळाडूंनी वेस्ट इंडिजचा दणदणीत पराभव केला. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या टी-20 तिरंगी मालिकेतील सहाव्या सामन्यात टीम इंडियाने सोमवारी विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय गोलंदाज दीप्ती शर्माने आपल्या घातक गोलंदाजीने धुमाकूळ घातला.

West Indies Women vs India Women
Rishabh Pant Health Update : पंतच्या प्रकृती विषयी आली मोठी अपडेट; या आठवड्यात कोकिलाबेन रूग्णलयात...

टीम इंडियाच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने 34 धावा केल्या मात्र तिचा संघ सहा विकेट्सवर 94 धावाच करू शकला. भारताकडून सर्वात जास्त दीप्ती शर्माने 4 षटकात केवळ 11 धावा देत 3 विकेट घेतल्या. दीप्तीसोबत पूजा वस्त्राकरनेही शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले. तर राजेश्वरी गायकवाडने एक विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने अवघ्या 13.5 षटकांत 8 विकेट्स राखून सामना जिंकला. भारतीय फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जने शानदार फलंदाजी करताना 39 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 42 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार हरमनप्रीत कौरने 23 चेंडूत 4 चौकार लगावत 32 धावा केल्या.

West Indies Women vs India Women
Indian Men's Hockey Team : वर्ल्डकप पराभवानंतर हॉकी इंडियात मोठी खळबळ; प्रशिक्षकांनी दिला राजीनामा

या त्रिकोणी मालिकेतील भारताचा प्रवास आतापर्यंत चांगला राहिला आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 27 धावांनी पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 56 धावांनी पराभव झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्याचवेळी, यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा पुन्हा पराभव केला. आता ती 2 फेब्रुवारीला अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.