INDW vs ENGW Women Test : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटीचा आज (दि.14) पहिला दिवस होता. या पहिल्याच दिवशी भारतीय महिला संघाने इतिहास रचला.
महिला कसोटी क्रिकेटच्या 88 वर्षाच्या इतिहासात कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 400 पेक्षा जास्त धावा करणारा भारतीय महिला संघ हा दुसरा संघ ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवशी 94 षटकात 7 बाद 410 धावा केल्या.
- महिला कसोटी क्रिकेटमध्ये 1935 साली इंग्लंड आणि न्यूझीलंड सामन्यात पहिल्या दिवशी 475 धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 44 धावा करून माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडने दिवस अखेर 4 बाद 431 धावा केल्या होत्या.
- 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी 449 धाा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 204 तर इंग्लंडने 245 धावा केल्या होत्या.
- 2023 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरूद्ध डी. वाय. पाटील स्टेडियमवर कसोटीच्या पहिल्या दिवशीच 410 धावा केल्या.
आजच्या सामन्यात भारताकडून शुभा सतीशने सर्वाधिक 69 तर जेमिमाह रॉड्रिग्जने 68 धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाज यस्तिका भाटियाने 88 चेंडूत 66 धावा आणि दिप्ती शर्माने नाबाद 60 धावांची खेळींचे योगदान दिले. हरमनप्रीत कौर 49 धावांवर धावबाद झाली.
भारताकडून कसोटीच्या पहिल्याच दिवशी दोन शतकी भागीदारी झाल्या. पहिली भागीदारी ही शुभा सतीश आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांच्यात झाली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी रचली.
त्यानंतर हमनप्रीत कौर आणि यस्तिका भाटिया यांनी पाचव्या विकेटसाठी 116 धावांची शतकी भागीदारी रचली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.