हांग् चौऊ : भारताच्या पॅरा ॲथलीटसनी इतिहास घडवला. येथील आशियाई पॅरा स्पर्धेत भारतीयांनी प्रथमच सर्वाधिक १११ पदके जिंकली. कोणत्याही बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एवढी सर्वाधिक पदके भारताला पहिल्यांदा मिळाली आहेत.
या १११ पदकांमध्ये ३९ सुवर्ण, ३१ रौप्य आणि ५१ ब्राँझपदकांचा समावेश आहे. हाँग चौऊ येथे २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीयांनी १०७ पदके मिळवली होती. या १११ पदकांसह भारताने पदक तक्त्यात पाचवे स्थान मिळवले.
चीनने ५२१ पदकांसह (२१५ सुवर्ण, १६७ रौप्य, १४० ब्राँझ) पहिले स्थान मिळवले, तर इराणने दुसरे, जपानने तिसरे आणि कोरियाने चौथे स्थान मिळवले. २०१० मधील पहिल्या पॅरा आशियाई स्पर्धेत भारताने १४ पदके मिळवून १५ वे स्थान मिळवले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.