India Won T20 World Cup 2024 : विश्‍वविजेत्यांना सलाम;भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईत जनसागर

बाजूला मरिन ड्राईव्हचा अथांग महासागर आणि त्याच्या बाजूला उसळलेला जनसागर अशा अभूतपूर्व आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या वातावरणात क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
India Won T20 World Cup 2024
India Won T20 World Cup 2024sakal
Updated on

मुंबई : बाजूला मरिन ड्राईव्हचा अथांग महासागर आणि त्याच्या बाजूला उसळलेला जनसागर अशा अभूतपूर्व आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या वातावरणात क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. लाडक्या क्रिकेटवीरांना सत्कारासाठी आलेल्या मुंबईकरांना वरुणराजानेही काही काळ चिंब केले.

गेल्या शनिवारी बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून तब्बल १७ वर्षानंतर पुन्हा ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे गुरुवारी सकाळी दिल्लीत आगमन झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संघाचा सत्कार करण्यात आला. पण मुंबईतील हा सोहळा केवळ अद्वितीय, अवर्णनीय असाच होता.

मरिन लाइन्स ते वानखेडे स्टेडियम आणि गिरगाव चौपाटीपर्यंतचा परिसर येथे लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी रोहित शर्माच्या संघाचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते. या परिसरात येऊ नका असा संदेश काही काळानंतर मुंबई पोलिसांना देण्याची वेळ आली.

हाऊसफुल्ल झालेले वानखेडे स्टेडियम सुवर्णक्षणांचे साक्षीदार होते. वानखेडे स्डेडियमध्ये होणाऱ्या सत्कार सोहळ्यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने मोफत प्रवेश दिला होता. साधारणतः सायंकाळी सात वाजता भारतीय संघ स्टेडियममध्ये येणे अपेक्षित होते, परंतु दुपारी तीन पासूनच स्टेडियम पूर्णपणे भरले होते.

विमानतळावरही सलामी

‘विस्तारा’च्या विमानाने भारतीय संघ दिल्लीहून मुंबई विमानतळावर दाखल झाला. हे विमान धावपट्टीवर थांबल्यानंतर दोन्ही बाजूंनी अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा वर्षाव करून सलामी दिली. त्यानंतर विमानतळ प्रशासनाच्या तीन गाड्यांनी विमानाला ‘एस्कॉर्ट’ केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.