भारत बॅडमिंटनमधील महासत्ता बनला - प्रकाश पदुकोन

थॉमस करंडकातील ऐतिहासिक सुवर्णपदकानंतर गौरवोद्‌गार
India won Thomas Trophy badminton game
India won Thomas Trophy badminton gamesakal
Updated on

नवी दिल्ली : थॉमस करंडकाच्या ऐतिहासिक विजयासह भारताने खेळाच्या जागतिक मंचावर आपले नाव नोंदवले आहे. कारण कोणत्याही वैयक्तिक यशापेक्षा ही खूप मोठी प्रगती आहे, असे मत माजी भारतीय दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन यांनी व्यक्त केला. भारताने रविवारी थॉमस करंडकाच्या अंतिम सामन्यामध्ये १४ वेळच्या विजेत्या इंडोनेशियाचा ३-० असा पराभव करून स्पर्धेच्या इतिहासात भारताला तब्बल ७३ वर्षांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले.

एवढ्या लवकर हे घडेल, अशी मला अपेक्षा नव्हती. यासाठी अजून आठ ते दहा वर्षे लागतील, असे मला वाटले होते. आता आपण बॅडमिंटन या खेळातील जागतिक महासत्ता झालो आहोत. त्यामुळे खेळाला मोठी चालना मिळणार आहे, असे पदुकोन यांनी या वेळी म्हटले आहे.

भारतासाठी प्रथमच ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप (१९८०) जिंकणारे पदुकोन पुढे म्हणाले, भारतीय बॅडमिंटनचा हा सुवर्णक्षण आहे, यात शंका नाही आणि या शानदार यशाचा फायदा करून घेण्याची गरज आहे. हा संपूर्ण सांघिक प्रयत्नांचा एक प्रभावी विजय आणि एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. त्यामुळे माझ्या मते कोणत्याही वैयक्तिक यशापेक्षा ही खूप मोठी गोष्ट आहे. खरे तर आम्ही सर्व जण अशा प्रकारच्या यशाची वाट पाहात होतो. त्यामुळे या यशाचे भांडवल करण्याची हीच योग्य वेळ आहे.

दुहेरी आता कमजोरी नाही

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दुहेरी जोडीचा उदय हे थॉमस करंडक स्पर्धेतील भारताच्या विजयाचे एक प्रमुख कारण असल्याचे मत पदुकोन यांनी मांडले. ‘‘दुहेरी ही आमची नेहमीच कमजोरी राहिली आहे; पण आता आमच्याकडे अशी दुहेरी जोडी आहे, जी जगातील कोणालाही पराभूत करू शकते. यापूर्वी एकेरीच्या खेळाडूंवर खूप दडपण होते; पण आता ते मुक्तपणे खेळू शकतात आणि हे आपण थॉमस करंडकाच्या कोर्टवर पाहिले,’’ असे पदुकोन म्हणाले.

महिला संघाबाबत चिंता

या ६६ वर्षीय पदुकोन यांनी महिला संघाच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पुरुष संघात नवनवे खेळाडू तयार होत आहेत. लक्ष्य सेन तरुण आहे. मिथुन, किरण असे काही खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे पुरुष विभागात आमचा संघ चांगला आहे; परंतु महिला विभागात आपल्याकडे पुरुषांइतकी ‘बेंच स्ट्रेंथ’ नाही. आपल्याकडे प्रतिभा आहे; पण यापैकी कोणीही सायना (नेहवाल) किंवा (पी.व्ही.) सिंधू यांच्या बरोबरीचे नाही. हे चिंताजनक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()