PAK vs ENG WTC Final : इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केल्याने फायदा होणार भारताचा; जाणून घ्या कसा

PAK vs ENG WTC Final India Chances
PAK vs ENG WTC Final India Chances esakal
Updated on

PAK vs ENG WTC Final : इंग्लंडने पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात थरारक विजय मिळवला. इंग्लंडने पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने आपला दुसरा डाव चौथ्या दिवशाची घोषित करण्याची जोखीम घेतली. याचा फायदा त्यांना पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात झाला. दिवस संपण्यास अवघी काही षटके राहिले असताना इंग्लंडने पाकिस्तानाची 10 वी विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडचा हा पाकिस्तानातील फक्त तिसरा कसोटी विजय होता. इंग्लंडच्या या विजयाचा अप्रत्यक्षरित्या भारताला मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का पोहचला आहे.

PAK vs ENG WTC Final India Chances
Babar Azam : तब्बल 1768 धावा! बाबर आझमने पाकिस्तानच्या पराभवाचे कोणावर फोडले खापर?

पाकिस्तान इंग्लंडविरूद्धची पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी WTC points table मध्ये पाचव्या स्थानावर होता. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान इंग्लंड आणि न्यूझीलंडविरूद्ध मिळून अजून पाच कसोटी सामने खेळणार होता. मात्र पहिल्या कसोटीत चौथ्या डावात खराब फलंदाजी केल्याने त्यांना WTC च्या फायनलमध्ये जाण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान सध्या अजूनही पाचव्या स्थानावरच आहे. मात्र जर ऑस्ट्रेलिया किंवा भारताने आगामी कसोटी मालिकेत विजय मिळवला तर पाकिस्तानचे WTC फायनलचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे.

PAK vs ENG WTC Final India Chances
PAK vs ENG : पाकिस्तान जिंकता जिंकता हरले! पहिल्याच कसोटीत इंग्लंडने लोळवले

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या रावळपिंडीतील पराभवानंतर भारताची फायनल खेळण्याची शक्यता वाढली आहे. जर भारताने बांगलादेशला क्लीन स्वीप दिला तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेत भारताला एका कसोटीत पराभव सहन करावा लागला तरी फारसा फरक पडणार नाहीये. कारण तरी देखील भारताला फायलन खेळण्याची संधी मिळू शकते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने जर वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश दिला. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यात विजय मिळवला तर त्यांना फायनल खेळण्याची संधी आहे.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.