Indian Army Subedar Preeti Rajak : भारताची ट्रॅप शूरट प्रिती रजकने इतिहास रचला. प्रिती रजक भारतीय लष्करातील सुभेदार ही रँक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. प्रिती यापूर्वी भारतीय लष्करात हवालदार या रँकवर होती. तिला पदोन्नती देण्यात आली आहे. याची घोषणा आज झाली. हा क्षण भारतीय लष्करासाठी ऐतिहासिक ठरला. (First Female Subedar In Indian Army)
सुभेदार रजक हिने भारतीय लष्करातील आपला प्रवास हा 2022 मध्ये कॉर्प ऑफ मिलिटरी पोलीस म्हणून सुरू केला होता. तिने आपल्या कामगिरीने सुभेदार पदापर्यंत मजल मारली आहे.
भारतीय लष्कराने आपल्या वक्तव्यात म्हटलं की, 'हावलदार प्रिती रजकला पदोन्नती मिळाल्याचे जाहीर करताना भारतीय लष्कराला खूप अभिमान वाटत आहे. ती एक उत्तम ट्रॅप शूटर आहे. ती आता लष्करात सुभेदार म्हणून कार्य करेल.'
प्रिती रजकने हांगझू येथे झालेल्या 19 व्या एशियन गेम्समध्ये रौप्य पदक पटकावले होते. महिला ट्रॅप शूटिंग सांघिक प्रकरात तिने दमदार कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीची दखल घेत भारतीय लष्कराने तिला आऊट ऑफ टर्न पदोन्नती दिली.
प्रिती सध्या भारतीय महिला ट्रॅप प्रकारात सहाव्या स्थानावर आहे. ती सध्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची तयारी करत आहे. क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करत भारतीय लष्कराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी उत्सुक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.