Tanya Hemanth Hijab Row : भारताची पदक विजेती बॅडमिंटनपटू तानियावर हिजाबची सक्ती

Tanya Hemanth Hijab Row
Tanya Hemanth Hijab Row esakal
Updated on

Tanya Hemanth Hijab Row : इराणमध्ये महिलांच्या हक्कांविषयी आक्रमक आणि हिंसक आंदोलने होऊनही इराणच्या प्रशासनावर काही फरक पडलेला दिसत नाहीये. इराण आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत जगभरातील अव्वल बॅडमिंटनपटूंनी सहभाग नोंदवला होता. भारताची महिला बॅडमिंटनपटू तानिया हेमंतने या दिग्गजाना पराभवाची धूळ चारत विजेतेपद पटकावले.

मात्र पदक घेण्यासाठी ज्यावेळी कर्नाटकची तानिया पोडियमकडे गेली त्यावेळी तिला हिजाब घालावा लागला. त्यानंतरच तिला पदक मिळाले. तानियाने तेहरानमध्ये इराण फज्र इंटरनॅशनल स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपद पटकावले.

Tanya Hemanth Hijab Row
Virat Kohli Rohit Sharma Controversy : विराट - रोहित वाद! शास्त्रींनी रूममध्ये बोलवलं अन्... माजी प्रशिक्षकाचा मोठा गौप्यस्फोट

प्रकाश पादुकोण बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तानियाने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर ती पदक घेण्यासाठी पोडियमकडे जात होती. त्यावेळी तिला हिजाब घालावा लागला. 19 वर्षाच्या तानियाने गतविजेत्या तमनीम मीरला पराभूत केले.

तानियाने पहिला गेम 21 - 7 असा सहज जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये तानियाला भारताच्याच गुजरातमधील बॅटमिंटनपटू तसनीमने चांगलीच झुंज दिली. मात्र तानियाने 21 - 11 असा जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

इराणमध्ये महिला बॅडमिंटनपटूंना सामन्यादरम्यान हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली नव्हती. त्यांना लेगिन्स देखील घालण्याची सक्ती नव्हती. मात्र महिलांचा सामना सुरू असताना कोणत्याही पुरूषाला सामना पाहण्याची परवानगी नव्हती.

एन्ट्री गेटवर कोणत्याही पुरूषाला स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नाही असा बोर्डच लिहिला होता. इतकंच काय तर खेळाडूंच्या आई वडिलांना आणि प्रशिक्षकांना देखील थांबवण्यात आले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेत मिश्र दुहेरीत जगभरातील 10 जोड्या देखील सामील झाल्या होत्या.

Tanya Hemanth Hijab Row
Women T20 World Cup Schedule : भारत - ऑस्ट्रेलिया आज भिडणार; जाणून घ्या सामना कधी अन् कोठे पहाल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांचे सामने हे सकाळी आणि पुरूषांचे सामने हे दुपारी झाली. महिला प्रेक्षकांनाच महिलांचे सामने पाहण्याची परवानगी होती. महिलांच्या सामन्यावेळी सगळे सामनधिकारी महिलाच होत्या. जे पुरूष पालक आपल्या मुलीला खेळताना पाहण्यासाठी आले होते. त्यांनाही सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली नाही. फक्त मिश्र दुहेरीच्या सामन्यातच पुरूष महिला एकत्र दिसले तेही बॅडमिंटन कोर्टवर!

(Sports Latest News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()