Badminton Asia Team : भारतीय बॅडमिंटन संघ अंतिम फेरीत ; त्रिसा-गायत्री गोपीचंद आणि अनमोल यांचे सनसनाटी विजय

शाह आलम (मलेशिया), ता. १७ (पीटीआय) : येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाच्या उंबरठ्यावर आहे.
Badminton Asia Team
Badminton Asia Team sakal
Updated on

शाह आलम (मलेशिया), (पीटीआय) : येथे सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाच्या उंबरठ्यावर आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी जपानचा ३-२ असा पराभव केला.

महिलांच्या दुहेरीत जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असलेल्या भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद आणि सतरावर्षीय अमनोल खारब यांनी सनसनाटी विजय मिळवल्यामुळे भारताला जपानवर मात करणे शक्य झाले.

Badminton Asia Team
Ind vs Eng 3rd Test Day 3 : सिराजनंतर यशस्वीनं गाजवला तिसरा दिवस, भारताकडे भक्कम आघाडी

उद्या होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना मलेशियाविरुद्ध होणार आहे. एकेरीतील पहिल्या सामन्यात पी. व्ही. सिंधूला आया ओहारीविरुद्ध १३-२१, २०-२२ अशा पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू १९-१० असे आघाडीवर होती, मात्र त्यानंतर तिला एकच गुण मिळवता आला या तुलनेत ओहारीने १२ गुणांची कमाई करत सिंधूला पराभवाचा धक्का दिला.

महिला दुहेरीत त्रिसा आणि गायत्री यांनी नामी मात्सुयामा आणि चिहारी शिदा यांचा २१-१७, १६-२१, २२-२० असा पराभव करुन १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर अश्मिताने आक्रमक खेल करत माजी विश्वविजेत्या नोझामी ओकुहाराला २१-१७, २१-१४ असा धक्का देत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.