CWG 2022 : बॅडमिंटन संघाची रौप्य कमाई; सुवर्ण पदकाच्या सामन्यात मलेशियाने दिली मात

Indian Badminton Team Won Silver Medal In Commonwealth Games 2022 Mix Team Event
Indian Badminton Team Won Silver Medal In Commonwealth Games 2022 Mix Team Eventesakal
Updated on

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय बॅडमिंटन संघाने (Indian Badminton Team) मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावले. सुवर्ण पदकाच्या सामन्यात मलेशियाने भारताचा 3-1 असा पराभव केला. त्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय बॅडमिंटन संघाने जिंकलेल्या रौप्य पदकामुळे भारताची पदक संख्या 13 वर पोहचली. पुरूष दुहेरीत मलेशियाने भारताला मात देत 1 - 0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पी व्ही सिंधूने (P.V. Sindhu) महिमला एकेरीचा सामना जिंकत 1 -1 अशी बरोबरी साधली. मात्र पुरूष एकेरीत किदंबी श्रीकांतला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे मलेशियाने 1 - 2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर महिला दुहेरीत

बॅडमिंटन मिश्र सांघिक प्रकारात भारत आणि मलेशिया सुवर्ण पदकासाठी भिडले. पहिला सामना पुरूष दुहेरीचा झाला. त्यात भारताच्या सात्विक रंकरेड्डी आणि चिराग शेट्टीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना तेंग फाँग आणि वूई सोह या मलेशियन जोडीने 18-21, 15-21 असे पराभूत केले. मलेशियाने सध्या 1 - 0 अशी आघाडी घेतली.

Indian Badminton Team Won Silver Medal In Commonwealth Games 2022 Mix Team Event
Lawn balls : भारताने सुवर्ण जिंकलेला लॉन बॉल्स खेळतात तरी कसा?

मलेशिया विरूद्धच्या मिश्र सांघिक प्रकारात भारताने सुवर्ण पदकाच्या सामन्यात 1 - 1 अशी बरोबरी साधली. पुरूष दुहेरीचा सामना हरल्यानंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला सिंगल्समध्ये जीन वे गोचा 22-20, 21-17 असा पराभव केला.

Indian Badminton Team Won Silver Medal In Commonwealth Games 2022 Mix Team Event
CWG 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूरची रूपेरी कामगिरी

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला सिंगल्समध्ये जीन वे गोचा 22-20, 21-17 असा पराभव केला. यामुळे भारताने सुवर्ण पदकाच्या सामन्यात मलेशियाशी 1 - 1 अशी बरोबरी केली होती. मात्र पुरूष एकेरीत किदंबी श्रीकांत 21-19, 6-21, 21-16 असा पराभूत झाला. त्यामुळे मलेशियाने पुन्हा मलेशियाने 2 - 1 अशी आघाडी घेतली.

Indian Badminton Team Won Silver Medal In Commonwealth Games 2022 Mix Team Event
भारताचा सुवर्ण पंच! टेबल टेनिसमध्ये पुरूष संघाने जिंकले सुवर्ण

महिला दुहेरीत मलेशियाच्या काँग ली पेअरली टॅन आणि मुलरीथर थिन्नाहने भारताची जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा पहिल्या गेममध्ये 21 - 18 असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये जॉली आणि गोपीचंद यांनी कडवी झुंज दिली. त्यांनी सामना 8 - 8 असा बरोबरीत आणला. मात्र त्यानंतर मलेशियाच्या जोडीने जोरदार मुसंडी मारत 7 गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा भारताच्या जॉली आणि गोपीचंद जोडीने सामना 17 -18 असा जवळ आणला. मात्र मलेशियाच्या मुलींनी सामना 21 - 17 असा जिंकत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.