संजीतचा गोल्डन पंच! अमित-थापाला रौप्य पदक

Sanjeet And amit panghal
Sanjeet And amit panghaltwitter
Updated on

भारताचा बॉक्सर संजीत (Sanjeet) याने हेवी वेट गटात देशाला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिलीये. 91 किलो वजनी गटातील फायनल सामन्यात संजीतने ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट वासिली लेविट याला पराभूत केले. तत्पूर्वी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील (Asian Boxing Championship) गतवर्षीचा चॅम्पियन अमित पंघल (Amit Panghal) (52 KG) याचा यंदाच्या वर्षीचा सुवर्ण पंच हुकलाय. अटितटीच्या झालेल्या फायनल लढतीत त्याला रिओ ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट जोइरोव शाखोबिदीन याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. (indian Boxer Sanjeet clinches 91kg gold amit panghal Shiva Thapa won silver medal in Asian Boxing Championship 2021)

Sanjeet And amit panghal
क्रिकेटरची सलमान स्टाईल स्टंटबाजी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

या पराभवामुळे त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. अमितने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये एकतर्फी विजय नोंदवणाऱ्या अमितने अंतिम सामन्यात कडवी झुंज दिली. पण अखेर त्याला पराभवाचा सामना करावा लागला. अमितने उज्बेकिस्तानच्या जोइरोव शाखाबिदीनविरुद्धच्या सामन्यात अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. त्याला 2-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. शिप थापाने 64 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले.

Sanjeet And amit panghal
वाढत्या वयात जिमी मोडणार सचिनचा विश्वविक्रम?

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) आणि यूएई बॉक्सिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग टीमने विशेष छाप सोडली आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकली आहेत. 2019 मध्ये बँकॉक येथे पार पडलेल्या स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग टिमने 13 पदक (2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य) जिंकत तिसरे स्थान पटकावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.