भारतीय तिरंदाज दोन्ही गटांत अंतिम फेरीत; पुरुषांसमोर अमेरिकेचे तर महिलांसमोर मेक्सिकोचे आव्हान

जागतिक स्पर्धा : भारतीय संघाने मेक्सिकोवरही मात करीत उपांत्य फेरीत पाऊल ठेवले.
indian compound archers make world cup final seal two medals America challenge for men and Mexico challenge for women
indian compound archers make world cup final seal two medals America challenge for men and Mexico challenge for women sakal
Updated on

पॅरिस (फ्रान्स) : भारतीय तिरंदाजांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील देदीप्यमान कामगिरी येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी (स्टेज फोर) स्पर्धेतही कायम राहिली. भारताच्या दोन्ही (पुरुष व महिला) संघांनी कंपाऊंड प्रकारातील सांघिक गटात अंतिम फेरीत धडक मारली.

आता सुवर्णपदकासाठीच्या लढतीत भारतीय पुरुषांसमोर अमेरिकेचे; तर भारतीय महिलांसमोर मेक्सिकोचे आव्हान असणार आहे. भारतीय पुरुषांच्या संघात ओजस देवताळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक वर्मा या तिघांचा समावेश आहे. तसेच भारताच्या महिला संघामध्ये अदिती स्वामी, ज्योती वेन्नम व परनीत कौर या तीन खेळाडूंचा समावेश आहे.

भारताचा पुरुषांचा संघ पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर राहिला. त्यानंतर पहिल्या फेरीत इटलीशी दोन हात करावे लागले. भारतीय संघाने इटलीवर २३९-२३५ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने मेक्सिकोवरही मात करीत उपांत्य फेरीत पाऊल ठेवले.

महिला संघाची शानदार कामगिरी

भारतीय महिला संघाने पात्रता फेरीपासूनच शानदार कामगिरी केली. त्यांनी २११३ गुणांसह पात्रता फेरीत पहिले स्थान पटकावले. महिला तिरंदाजांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत इस्तोनियावर २३३-२३० आस विजय मिळवत भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत वाटचाल केली.

ग्रेटब्रिटनला उपांत्य फेरीत २३४-२३३ असे नमवत भारतीय महिला तिरंदाजांनी सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने शानदार पाऊल टाकले. येत्या १९ ऑगस्ट रोजी दोन्ही गटांच्या अंतिम लढती खेळवण्यात येणार आहेत.

ओजसच्या अचूक बाणामुळे पुढे पाऊल

भारताचा पुरुषांचा संघ उपांत्य फेरीत कोरियाशी लढला. या लढतीत दोन्ही देशांमध्ये २३५-२३५ अशी बरोबरी झाली. त्यानंतर शूटऑफचा अवलंब करण्यात आला. शूटऑफमध्ये दोन्ही देशांतील तिन्ही तिरंदाजांना प्रत्येकी एक बाण लक्ष्याच्या दिशेने सोडावा लागतो.

या शूटऑफमध्येही दोन्ही देशांमध्ये ३०-३० अशी बरोबरी झाली. ओजस देवताळे याचा बाण मध्यभागी अचूक निशाण्यावर लागला होता. त्याचाच बाण इतरांच्या बाणापेक्षा अचूक होता. त्यामुळे भारताला या लढतीत विजयी घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.