क्रिकेट जगतावर शोककळा; माजी क्रिकेटपटू सलीम दुराणी यांचे निधन

टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले.
Indian cricket legend Salim Durani dies at 88
Indian cricket legend Salim Durani dies at 88
Updated on

टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुजरातच्या जामनगर येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते कर्करोगाने ग्रस्त होते. दुराणी यांच्या निधनामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.(Indian Cricket Legend Salim Durani Dies At 88)

जन्माने अफगाणी

अफगाणिस्तानमधील कबूल येथे जन्मलेले दुराणी प्रथम कराची आणि नंतर भारतात आले. दुराणी आठ महिन्याचे होते तेव्हा त्यांचे कुटुंबीय कराचीला आले. त्यानंतर भारताची फाळणी झाली तेव्हा ते भारतात आले. ६०-७०च्या दशकात दुराणी यांनी अष्ठपैलू म्हणून वेगळी ओळख निर्माण केले.

भारतीय संघातील एक शानदार अष्ठपैलू असा त्यांचा उल्लेख केला जातो. १९६०च्या दशकात दुराणी यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने गौरविण्यात आलेले ते पहिले क्रिकेटपटू होते.

सलीम दुराणी यांनी टीम इंडियाकडून एकूण 29 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 1 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1202 धावा केल्या. तसेच गोलंदाजीमध्ये त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या. फलंदाजीमध्ये 104 धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या असून गोलंदाजीत 177 धावांमध्ये 10 विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे.

चित्रपटातही केलं काम

सलीम दुराणी यांनी फेब्रुवारी 1973 ला इंग्लंडविरुद्ध मुंबईत आपला अखेरचा कसोटी सामना खेळला. याच वर्षी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटनंतर त्यांनी आपला मोर्चा चित्रपट क्षेत्राकडे वळवला. ‘चरित्र’ या बॉलिवूडपटामध्ये त्यांनी काम केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत तेव्हाची आघाडीची अभिनेत्री परवीन बॉबी झळकली होती.

प्रेक्षकांच्या मागणीनुसार ठोकायचे षटकार

60-70च्या दशकामध्ये सलीम दुराणी यांनी आपल्या अष्टपैलू खेळाने क्रिकेटमध्ये नवी ओळख मिळवली. 1960 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मुंबई कसोटी त्याने पदार्पण केले. विस्फोटक फलंदाजी आणि कामचलाऊ गोलंदाजी ही त्यांची ओळख होती. प्रेक्षकांच्या मागणीनुसार ते षटकारही ठोकत होते. यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धीही मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.