अजूनही टीम इंडिया जिंकू शकते; इंग्लंड-पाक दिग्गजांमध्ये रंगला 'सामना'

पाकिस्तान दिग्गजाने दिला कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानातील टीम इंडियाच्या ऐतिहासिक खेळीचा दाखला
IND vs ENG
IND vs ENGTwitter
Updated on

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने दमदार कमबॅक केले. पहिल्या डावात 78 धावांत गुंडाळलेल्या भारतीय संघाने 2 विकेटच्या मोबदल्यात 200 पार मजल मारली. टीम इंडियाच्या या कामगिरीचे पाकिस्तानचा माजी कर्णधाराने कौतुक केले आहे. एवढेच नाही तर भारतीय संघ अशक्यप्राय वाटणारी गोष्टही या सामन्यात करुन दाखवू शकतो, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक यांनी भारतीय संघाच्या कोलकाताच्या ईडन गार्डन्सवरील ऐतिहासिक कसोटीचा दाखला दिलाय. 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अगदी लीड्सच्या कसोटीप्रमाणेच बॅकफूटवर होता. त्या सामन्यात व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडच्या दमदार खेळीच्या जोरावर फॉलोऑन टाळला. त्यानंतर या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला होता. ही आठवण करुन देत इंझमामन उल हक यांनी टीम इंडियात लीड्सचे मैदान मारण्याची ताकद असल्याचे म्हटले आहे.

IND vs ENG
Paralympics: भाविनामुळे भारताला गोल्ड मेडलची संधी

इंझमाम आपल्या युट्युब चॅनेलवरील कार्यक्रमात म्हणाले की, मला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तो कसोटी सामना आजही आठवतोय. त्या सामन्यात लक्ष्मणने 281 आणि द्रविड़ने 180 धावांची खेळी केली होती. त्या कसोटी सामन्याप्रमाणेच लीड्सच्या मैदानातही भारतीय संघ चमत्कार करु शकतो. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने दबावातही उत्तम खेळ केला. त्यांनी केवळ दोन विकेट गमावल्या असून अनुभवी फंलदाज अजून बॅटिंगला येणं बाकी आहे, असा उल्लेख इंझमाम यांनी केलाय.

IND vs ENG
VIDEO : रोहित आउट झाला अन् विराट आधी इंग्लिश मॅन बॅटिंगला आला

यापूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने जिंकून दाखवावे, असे चॅलेंज दिले होते. लीड्सच्या मैदानात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला आणखी खूप मेहनत घ्यावी लागेल. ही कोलकाताची खेळपट्टी नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. याला पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()