Team India Meets PM Modi: पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचा सत्कार, तोंडभरुन कौतुक; व्हिडिओ आला समोर

Watch T20 World Cup winning Indian team meets Prime Minister Narendra Modi Video: भारताच्या विजयी क्रिकेट टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी मोदींनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले.
Team Meets PM
Team Meets PMeSakal

नवी दिल्ली- भारताच्या विजयी क्रिकेट टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी मोदींनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. तसेच टीमचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यामध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली आहे. मोदींनी प्रत्येक खेळाडूशी संवाद साधला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.

भारतीय क्रिकेट टीम टी-२० वर्ल्ड कप जिंकून आज सकाळी बार्बाडोसमधून मायदेशी परतलेली आहे. याआधीच टीम इंडिया परत येणार होती. पण, काही अडचणीमुळे त्यांना यायला चार दिवस उशीर झाला. मात्र, आज भारतात दाखल झालेल्या टीमचे स्वागत करताना चाहत्यांचा उत्साह थोडा देखील कमी झालेला नाही. टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.

Team Meets PM
Team India Arrival : फ्लाइटमध्ये ट्रॉफीचं अनबॉक्सींग अन् रोहित-सूर्याचा धुमाकूळ! BCCI शेअर केला 'तो' व्हिडिओ

टीम इंडिया आज सकाळी सहा वाजता दिल्ली विमानतळावर उतरली. याठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात चाहते जमा झाले होते. सुरुवातील टीम इंडिया ITC मौर्य हॉटेलमध्ये गेली. याठिकाणी त्यांच्या आवडीच्या पदार्थांची मेजवाणी ठेवण्यात आली होती. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास ७ लोक कल्याण मार्ग याठिकाणी गेले.

पंतप्रधान मोदी यांनी विजयी टीमचे स्वागत केले, त्यांचा सत्कार केला. प्रत्येकाशी संवाद साधून त्यांचा अनुभव जाणून घेतला. त्यांना कौतुकाची थाप दिली आणि पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात मोदी रोहित शर्मा, राहुल द्रविड, विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव अशा सर्वा खेळाडूंशी बोलताना दिसत आहेत. मोदींनी ट्रॉफी हातात घेऊन टीम इंडियासोबत फोटो देखील काढला आहे.

Team Meets PM
Team India Arrives: अखेर टीम इंडिया विजयी ट्रॉफीसह मायदेशी; दिल्ली विमानतळावर चाहत्यांची तुफान गर्दी; Video

मुंबईमध्ये टीम इंडियाची आज मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी ओपन डेकर बस सज्ज करण्यात आली आहे. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी टीम इंडियाची मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी मोठ्या प्रमाणात चाहते आपल्या विजयी टीमला पाहण्यासाठी जमा होण्याची शक्यता आहे. वानखेडे स्टेडियमवर टीमला १२५ कोटींचे बक्षीस बीसीसीआयकडून दिलं जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com