टीम इंडिया आधी या क्रिकेट संघांनी अवलंबली Split Captaincy रणनिती

विराट कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडण्याची स्पष्टोक्ती दिल्यामुळे भारतीय क्रिकेट स्प्लिट कॅप्टन्सीच्या ट्रॅकवर जात असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
टीम इंडिया आधी या क्रिकेट संघांनी अवलंबली Split Captaincy रणनिती
Updated on

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काळानुरुप नवे बदल पाहायला मिळतात. यात आता स्प्लिट कॅप्टन्सी थिओरी (Split Captaincy Theory) चा नवा फंडा अनेक क्रिकेट बोर्ड स्विकारताना दिसत आहेत. वनडे, कसोटी आणि टी-20 क्रिकेट प्रकारात विभागून कर्णधारपद देण्याच्या या मार्गावर भारतीय क्रिकेट जाणार नाही, असे बोलले गेले. पण विराट कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडण्याची स्पष्टोक्ती दिल्यामुळे भारतीय क्रिकेट स्प्लिट कॅप्टन्सीच्या ट्रॅकवर जात असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

स्प्लिट कॅप्टन्सी थियरीनुसार, क्रिकेटच्या मर्यादित षटकांसाठी आणि कसोटी क्रिकेट प्रकारातील टीमसाठी किमान दोन वेगवेगळे कर्णधार निवडण्याला सुरुवात झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघातही या पद्धतीचा वापर सुरु होईल.

टीम इंडिया आधी या क्रिकेट संघांनी अवलंबली Split Captaincy रणनिती
T20: 'टीम इंडिया'च्या उपकर्णधार पदासाठी 'ही' ३ नावे चर्चेत

2017 मध्ये विराट कोहलीकडे भारतीय संघाच्या तिन्ही प्रकारातील नेतृत्व देण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरीही दमदार झाली. पण स्वत: त्याने वर्कलोडचं कारण देत टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका कर्णधारावर सर्व क्रिकेट प्रकारातील जबाबदारी न देता ती विभागून देत कर्णधारावरील ताण कमी करुन संघाला अधिक फायदा होईल, याच उद्देशानेच स्प्लिट कॅप्टन्सीचा प्रयोग सुरु करण्यात आला आहे.

टीम इंडिया आधी या क्रिकेट संघांनी अवलंबली Split Captaincy रणनिती
विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर इरफान म्हणतो...

टीम इंडियासाठी ही थियरी फायदेशीर ठरेल का?

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिन्ही प्रकारात दमदार कामगिरी नोंदवली आहे. त्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. (आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत विराटच्या नेतृत्वाखाली संघ अपयशी ठरला असला तरी त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी वाखाणण्याजोगीच आहे.) परंतु कॅप्टन्सीचे ओझे खांद्यावर असताना फलंदाजीवर थोडाफार फरक पडतो. जवळपास दोन वर्षांपासून विराटच्या भात्यातून शतक पाहायला मिळालेलं नाही.

नेतृत्वामुळे न कळत निर्माण झालेल्या दबावाचाही हा परिणाम असू शकतो. क्रिकेटच्या एका प्रकारातील कर्णधार पदाचे ओझे खांद्यावरुन उतरल्यानंतर त्याच्या फलंदाजीत नक्कीच सुधारणा होऊ शकते. तो पुन्हा आपल्या जुन्या तेवरमध्ये खेळताना दिसले तर त्याचा फायदा हा टीम इंडियालाच होईल.

रोहित शर्मासारखा चांगला पर्याय असल्यामुळे तोट्याचा प्रश्नच नाही

स्प्लिट कॅप्टन्सीच्या वाटेवर जाताना विराट कोहोलीचा जागा घेण्यासाठी सक्षम पर्याय टीम इंडियाकडे आहे. आयपीएल स्पर्धेत रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे रोहित शर्मा खांद्यावर पडलेले 'विराट' ओझे सक्षमरित्या निभावून दाखवेल.

या संघानी आधीच अवलंबली आहे ही पद्धती

इंग्लंड- ज्यो रुट (कसोटी) इयॉन मॉर्गन (वनडे आणि टी-20)

ऑस्ट्रेलिया - टिम पेन (कसोटी), एरॉन फिंच (वनडे आणि टी-20)

वेस्ट इंडिज - क्रेग ब्रेथवेट (कसोटी), करॉन पोलार्ड (वनडे आणि टी-20)

दक्षिण आफ्रिका- डेन एल्गर (कसोटी), टेंम्बा बवुमा (वनडे आणि टी-20)

बांगलादेश - मोमीनुल हक (कसोटी), तमीम इक्बाल (वनडे आणि टी-20)

श्रीलंका- दिमुथ करुणारत्ने (कसोटी), दसुन शनाका (वनडे आणि टी-20)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.