भारतीय महिला संघाची प्रमुख खेळाडू असलेली प्रिया पुनियाच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनामुळे दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर यातून सावरत प्रिया इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्यास सज्ज झालीये. भारतीय पुरुष संघासोबत भारतीय महिला संघही इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी प्रिया पुनियाचाही संघात समावेश आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय महिला संघ मुंबईत तयार करण्यात आलेल्या बायोबबलमध्ये दाखल झालाय. आई गेल्याचे दु:ख विसरुन प्रिया आपले कर्तव्य बजावण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. प्रिया पुनिया टीमच्या बायोबबलमध्ये सामील झाली आहे. या कठोर निर्णयानंतर तिचे कौतुकही केले जात आहे. (Indian cricketer Priya Punia decided to commitments just days after her mother passed away of Covid-19)
कोरोनामुळे आईचे निधन झाल्यानंतर प्रिया पुनियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावूक पत्र शेअर केले होते. क्रिकेटच्या प्रवासामध्ये आईचे योगदान मोलाचे असल्याचा उल्लेख तिने पत्रामध्ये केला होता. प्रिया पुनियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पहिला वनडे सामना खेळला होता. तिने 75 धावांची नाबाद खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रिया पुनियाने आतापर्यंत 7 वनडे सामने खेळले असून तिच्या खात्यात 225 धावा जमा आहेत.
आईचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर खेळण्याचा लेकीनं घेतलेला निर्णय अभिमानास्पद असल्याचे तिचे वडील सुरेंद्र पुनिया यांनी म्हटले आहे. घरी दु:खद घटना घडली असली तरी राष्ट्रीय जबाबदारीतून माघार घेणार नाही, अशी भूमिका प्रियाने घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नुकतेच बीसीसीआयने 19 महिला क्रिकेट खेळाडूंसोबत वार्षिक करार केला. प्रिया पुनियाला या कॉन्ट्रॅक्टमध्ये तिसऱ्या श्रेणीत स्थान मिळाले. या करारानुसार तिला वार्षिक 10 लाख रुपये वेतन मिळणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.