टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजानं ठोकलं द्विशतक

ही क्रिकेट जगतातील ऐतिहासिक कामगिरी आहे.
Subodh Bhati
Subodh BhatiInstagram
Updated on

क्रिकेटच्या मैदानात नव्या विक्रमाची नोंद झालीये. दिल्लीच्या रणजी संघातून खेळणाऱ्या सुबोध भाटी (Subodh Bhati) याने टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवण्याचा पराक्रम करुन दाखवलाय. ही क्रिकेट जगतातील ऐतिहासिक कामगिरी आहे. टी-20 क्लब क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली इलेव्हन क्लबकडून खेळताना सुबोध भाटीने सिम्बा क्लब विरुद्ध 205 धावांची खेळी केली. 79 चेंडूत 17 चौकार आणि 17 षटकाराच्या मदतीने त्याने नाबाद 205 धावांची विश्वविक्रमी खेळी साकारली. टी-20 क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावर द्विशतक झळकवाणार तो पहिला खेळाडू आहे. (Indian Cricketer Subodh Bhati Hits An Double Century In A-T20-Club Game)

सुबोध भाटीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ऐतिहासिक कामगिरीचा स्कोअर बोर्ड शेअर केलाय. सिम्बा क्लब विरुद्ध सुबोधने आपल्या संघाच्या डावाला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. त्याच्या धमाकेदार खेळाच्या जोरावर दिल्ली इलेव्हन क्लबने निर्धारित 20 षटकात 256 धावा केल्या. यात सुबोधच्या 205 धावांचा समावेश होता.

Subodh Bhati
स्मृती मानधनाचा ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल
Subodh Bhati
Copa : फायनलसाठी मेस्सीच्या अर्जेंटिनासमोर कोलंबियाचे आव्हान

सुबोध शिवाय अन्य दोन फलंदाजांनी संघाच्या धावफलकात 31 धावांची भर घातली. सचिन भाटी आणि सुबोध भाटी या जोडगोळीनं दिल्ली इलेव्हन क्लबच्या डावाला सुरुवात केली. एका बाजूला सुबोध फटकेबाजी करत असताना सचिन भाटीच्या रुपात दिल्ली इलेव्हनला पहिला धक्का बसला. त्याने 33 चेंडूचा सामना करताना 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 25 धावांचे योगदान दिले. कर्णधार विकास भाटी 8 चेंडूत 6 धावा करुन त्याच्यासोबत नाबाद परतला. सुबोधने केलेली द्विशतकी खेळी ही उच्चस्तरीय स्पर्धेतील नसली तरी त्याने आपल्यातील धमक दाखवून दिलीये. आगामी काळात तो आयपीएल स्पर्धेत एखाद्या संघाकडून खेळताना दिसला तर नवल निश्चितच वाटणार नाही.

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोच धावसंख्या करण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. आयपीएल स्पर्धेत ख्रिस गेलने 175 धावांची खेळी केली होती. 2013 मध्ये त्याने पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळताना 66 चेंडूत नाबाद 175 धावा ठोकल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.